शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

अनधिकृत होर्डिंग्समुळे महापालिकेला लाखोचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:55 IST

अकोला: मुख्य मार्ग, चौक असो वा विद्युत खांब, वाणिज्यिक जाहिरातीचे फलक, होर्डिंग्सने भरगच्च भरलेले आहेत. यातील बहुतांश फलक व बॅनर महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

अकोला: मुख्य मार्ग, चौक असो वा विद्युत खांब, वाणिज्यिक जाहिरातीचे फलक, होर्डिंग्सने भरगच्च भरलेले आहेत. यातील बहुतांश फलक व बॅनर महापालिकेच्या परवानगीशिवाय लावण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा फटका बसत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शहरातील मुख्य चौकांमध्ये तसेच मार्गावर विविध प्रतिष्ठांनांच्या वाणिज्यिक जाहिरातींचे बॅनर व फलक लावण्यात येत आहेत. यातील बहुतांश फलक विनापरवानगी विद्युत खांबावर लावण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणेला हाताशी घेतल्याचा आरोप यापूर्वी शहरातील महासभेत तथा स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी केला आहे. शहरात ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंग्समुळे शहराचे विद्रुपीकरण झाले असून, त्यामुळे महापालिका प्रशासनाला कुठल्याच प्रकारचे उत्पन्न मिळत नाही. लाखो रुपयांचा फटका बसत असला तरी मनपा प्रशासन त्या विरोधात कुठलीच कार्यवाही करत नसल्याने शहराच्या विद्रुपीकरणाचा हा प्रकार झपाट्याने वाढत आहे; मात्र मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्याऐवजी संबंधित विभागाचे कर्मचारी स्वहिताकडे अधिक लक्ष देत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची दखल नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस यांनी घेण्याची गरज असून, अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.अतिक्रमण विभाग ठरतोय निष्क्रियशहरातील सर्वच फलक, बॅनर आणि होर्डिंग्सची नोंद केली, तर अनेक मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे; परंतु यातील बहुतांश होर्डिंग्स व बॅनरला परवानगी नसल्याची माहिती असूनही त्याकडे अतिक्रमण निर्मूलन विभाग कार्यवाही करत नसल्याने निष्क्रिय ठरत आहे. 

शहरात लावण्यात आलेल्या होर्डिंग्सची संपूर्ण माहिती घेऊन अनधिकृत फलक, होर्डिंग्सवर कारवाई करणार. शिवाय त्यांना परवानगी कशा पद्धतीने देण्यात आली, फलकाच्या करारनाम्याबद्दल माहिती घेऊन चौकशी करू. तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- संजय कापडणीस, आयुक्त, महापालिका, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका