शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एसपीं’च्या निवासस्थानी पत्रकाराचा अनधिकृत प्रवेश

By admin | Updated: October 13, 2016 03:10 IST

अकोला येथील प्रकार; चार पोलिसांवर निलंबनाची टांगती तलवार.

अकोला, दि. १२- पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या अशोक वाटिका रोडवरील निवासस्थानामध्ये एका पत्रकाराने मंगळवारी रात्री ११ वाजून ३0 मिनिटांच्या सुमारास अनधिकृतरीत्या प्रवेश केल्याने, यावेळी निवासस्थानावर कार्यरत असलेल्या चार पोलीस कर्मचार्‍यांना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी नोटीस बजावली आहे. या चारही पोलिसांचे बयाण नोंदविल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांचे अशोक वाटिका ते गोयनका महिला महाविद्यालय रोडवर निवासस्थान आहे. या निवासस्थानाला दोन प्रवेशद्वार असून, एक अशोक वाटिका रोडवर, तर दुसरे प्रवेशद्वार सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या रोडवर आहे. या दोन्ही प्रवेशद्वारावर मंगळवारी रात्री एएसआय निळे, पोलीस कर्मचारी गावंडे, ढोरे आणि सावरकर कार्यरत होते. हे चारही पोलीस कर्मचारी कार्यरत असताना मंगळवारी रात्री ११ वाजून ३0 मिनिटांच्या सुमारास एका पत्रकाराने पोलीस अधीक्षक मीणा यांच्या निवासस्थानामध्ये थेट प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानाच्या चोहीकडे हा पत्रकार फिरल्याची माहिती आहे. हा प्रकार पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या लक्षात रात्री १२ वाजेच्या सुमारास येताच, त्यांनी मंगळवारी रात्री कार्यरत असलेल्या चारही पोलिसांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. या चारही पोलिसांचे बयाण घेण्यात येणार असून, त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेनंतर एका पत्रकाराने निवासस्थानामध्ये अनधिकृत प्रवेश केला. या प्रकरणी संबंधितांना नोटीस देण्यात आली आहे. त्यांचे बयाण घेण्यात येणार असून, त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. -चंद्रकिशोर मीणा,पोलीस अधीक्षक, अकोला.