शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत हद्दीत अनधिकृत बांधकामांचा सपाटा

By admin | Updated: July 19, 2016 02:02 IST

अकोला महापालिकेचा इशारा विरला हवेत.

आशीष गावंडे/ अकोलामहापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीत शहरानजीकच्या २४ गावांचा समावेश आहे. संभाव्य हद्दवाढ लक्षात घेता बांधकाम व्यावसायिकांनी ग्रामपंचायत हद्दीत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सपाटा लावला आहे. सदर बांधकामे तातडीने न थांबवल्यास संबंधित तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांच्या विरोधात पोलीस तक्रारीचा मार्ग खुला असल्याचा महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी स्पष्ट इशारा दिला होता प्रत्यक्षात मात्र हा इशारा हवेत विरल्याचे चित्र आहे. मनपाच्या हद्दवाढीच्या दिशेने शासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हद्दवाढीची प्रक्रिया पूर्ण होणार असून, मनपा क्षेत्रात शहरानजीकच्या २४ गावांचा समावेश होईल. शासनाकडे विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल)चा प्रस्ताव विचाराधीन असून, निश्‍चितच चटई निर्देशांक (एफएसआय)मध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत ह्यडीसी रूलह्ण लागू होत नाही, तोपर्यंत इमारतींचे अवाजवी बांधकाम बंद करण्याचे आदेश आयुक्त अजय लहाने यांनी जारी केले आहेत. त्यानुसार शहरात व्यावसायिक तसेच रहिवासी इमारतींचे बांधकाम ठप्प पडून आहे. यादरम्यान, शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहे. हद्दवाढ होईल या विचारातून बांधकाम व्यावसायिकांनी सदनिका (फ्लॅट) विकण्याचा सपाटा लावला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तातडीने बंद करण्याच्या मुद्यावर आयुक्त अजय लहाने यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार, संबंधित ग्रामपंचायतचे तलाठी, ग्रामसेवक व सरपंच यांची बैठक घेऊन इमारतींचे बांधकाम तत्काळ बंद करण्याचा आदेश दिला होता. सदनिका, दुकानांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पार पडले असतील तरीही संबंधित तलाठी, ग्रामसेवक, सरपंचासह कंत्राटदाराविरोधात पोलीस तक्रारीचा मार्ग खुला असल्याचे आयुक्त लहाने यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. हद्दवाढीच्या हालचाली पाहता मनपा आयुक्तांच्या आदेशाला ठेंगा दाखवत ग्रामपंचायत क्षेत्रात अनधिकृत बांधकामे तातडीने पूर्ण केली जात आहेत.