शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील अनधिकृत इमारतींना क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 13:58 IST

क्षेत्रीय अधिकाºयाने इमारतींचा अहवाल तर सोडाच अशा इमारतींचे मोजमापही केले नसल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देअनधिकृत इमारतींचे मोजमाप करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाºयांना दिले होते. नियम पायदळी तुडवित शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत.

- आशिष गावंडे

अकोला: राज्य शासनाने हार्डशिप अ‍ॅन्ड कम्पाउंडिंगची नियमावली लागू केल्यानंतर डिसेंबर २०१५ पूर्वीची बांधकामे नियमानुकुल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतरही शहरात अनधिकृत इमारती उभारल्या जात असल्याचे लक्षात घेता महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी २०१७-१८ या कालावधीत उभारलेल्या अनधिकृत इमारतींचे मोजमाप करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाºयांना दिले होते. आयुक्तांच्या निर्देशाला आठ महिन्यांचा कालावधी झाला असला तरी आजवर चारपैकी एकाही क्षेत्रीय अधिकाºयाने इमारतींचा अहवाल तर सोडाच अशा इमारतींचे मोजमापही केले नसल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार पाहता अनधिकृत इमारतींना क्षेत्रीय अधिकाºयांचे अभय असल्याचे स्पष्ट होते.कमर्शियल तसेच रहिवासी इमारतींचे बांधकाम करताना एक चटई निर्देशांक (एफएसआय) अपुरा पडत असल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांनी लावून धरली होती. यासंदर्भात राज्य शासनाने मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली कुंटे समितीचे गठन केले होते. कुंटे समितीच्या शिफारशी ध्यानात घेता १.१ इतका ‘एफएसआय’ वाढविण्यात आला. अनधिकृत इमारतींची समस्या पाहता शासनाने २०१५ पर्यंतच्या इमारतींना अधिकृत करण्यासाठी ‘हार्डशिप अ‍ॅन्ड क म्पाउंडिंग’ची नियमावली लागू केली. त्यानुषंगाने मनपा प्रशासनाने बांधकाम व्यावसायिकांना हार्डशिप अ‍ॅन्ड कम्पाउंडिंग अंतर्गत आॅगस्ट २०१८ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. नगररचना विभागाचे सर्व निकष, नियम पायदळी तुडवित शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. ‘हार्डशिप अ‍ॅन्ड क म्पाउंडिंग’अंतर्गतसुद्धा इमारती नियमानुकुल होणार नाहीत, याची खात्री असलेल्या बिल्डरांनी मनपाकडे पाठ फिरवल्याची परिस्थिती आहे. शहरात राजरोसपणे इमारतींचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या निदर्शनास येताच त्यांनी २०१७-१८ या कालावधीत बांधलेल्या कमर्शियल आणि रहिवासी अपार्टमेंटच्या इमारतींचे मोजमाप घेऊन त्यांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाºयांना दिले होते. मागील आठ महिन्यांपासून संबंधित बांधकामाच्या मोजमापाचा अहवाल अद्यापही मनपात दाखल झाला नसल्याची माहिती आहे. हा प्रकार पाहता नगररचना विभागासह क्षेत्रीय अधिकाºयांचे अशा इमारतींना अभय असल्याची दबकी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका