शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी उमरी रस्त्याचे होणार रूंदीकरण; महापौर, आयुक्तांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 15:15 IST

अकोला: मोठी उमरी ते गुडधी रोडवरील चाळीस क्वॉर्टरपर्यंत रस्ता रूंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. या रस्त्याची शासकीय मोजणी शिट तयार झाल्यानंतर शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी उमरी परिसरातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

ठळक मुद्देमोठी उमरी ते गुडधी परिसरातील चाळीस क्वॉर्टरपर्यंत १ हजार ८०० मीटर मुख्य रस्त्याच्या रूंदीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.रस्त्याचा मध्यभाग (सेंटर)काढून रस्त्यालगतच्या इमारतींना ‘मार्किंग’करण्याचे काम आटोपल्याची माहिती आहे. शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मोठी उमरी परिसरातील मालमत्ताधारकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

अकोला: मोठी उमरी ते गुडधी रोडवरील चाळीस क्वॉर्टरपर्यंत रस्ता रूंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. या रस्त्याची शासकीय मोजणी शिट तयार झाल्यानंतर शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी उमरी परिसरातील नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.महापालिका क्षेत्राची हद्दवाढ केल्यानंतर त्यामध्ये शहरालगतच्या २४ गावांचा समावेश करण्यात आला. हद्दवाढीत सामील झालेल्या नवीन प्रभागांच्या विकास कामांसाठी आ.रणधीर सावरकर यांनी १०० कोटींच्या विकास आराखड्याला शासनाची मंजुरी मिळवली. यादरम्यान, मोठी उमरी ते गुडधी परिसरातील चाळीस क्वॉर्टरपर्यंत १ हजार ८०० मीटर मुख्य रस्त्याच्या रूंदीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागणीनुसार भूमि अभिलेख विभागाने मोठी उमरीतील रेल्वे पूल ते चाळीस क्वॉर्टरपर्यंत रस्ता व रस्त्यालगतच्या मालमत्तांची मोजणी शिट तयार केली. त्यानुसार ‘पीडब्ल्यूडी’ व मनपाचा नगररचना विभाग, विद्युत विभाग कामाला लागले आहेत. रस्त्याचा मध्यभाग (सेंटर)काढून रस्त्यालगतच्या इमारतींना ‘मार्किंग’करण्याचे काम आटोपल्याची माहिती आहे. यानंतर रस्ता रूंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या इमारतींचा अतिक्रमीत भाग काढण्याची कारवाई केली जाईल. त्यानुषंगाने शुक्रवारी महापौर विजय अग्रवाल, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मोठी उमरी परिसरातील मालमत्ताधारकांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच रस्ता रूंदीकरणाचे महत्त्व पटवून दिले. याप्रंसगी भाजप नगरसेवक मिलिंद राऊत, संदीप गावंडे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.रेल्वे पूल ते जठारपेठ चौकाकडे येणारा सिमेंट रस्ता अरूंद असल्यामुळे या ठिकाणी दररोज अपघात होतात. प्रशस्त रस्त्यांमुळे विकासाला चालना मिळते. त्यामुळेच मोठी उमरीचा रस्ता १८ मीटर रूंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आ.रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी साडेपाच कोटींची तरतूद करण्यात आली असून, गरज भासल्यास वाढीव निधी प्राप्त करता येईल.-विजय अग्रवाल, महापौर. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका