शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

भ्रष्टाचाराची तरुणाईला चिड!

By admin | Updated: August 2, 2016 00:12 IST

लाचखोरांच्या तक्रारी करण्यात तरुणाई आघाडीवर; भ्रष्टाचारात महसूल व पोलीस खाते आघाडीवर.

अकोला: तरुणाईचा स्वभाव अन्यायाविरुद्ध लढण्याचा आहे. अन्याय, भ्रष्टाचार, अप्रामाणिकता याविषयी तरुणाईच्या मनात प्रचंड राग आहे. तो तक्रारींच्या माध्यमातून व्यक्त करण्याची संधी तरुणाई सोडत नसल्याचे दिसून येते. गत दोन वर्षांमध्ये लाचखोरांविरुद्ध तरुणाई चांगलीच सरसावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार्‍यांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. दोन वर्षांमध्ये २६ ते ३५ वर्षे वयोगटातील ६७२ युवकांनी लाचखोरांविरुद्ध तक्रारी नोंदविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालामध्ये म्हटले आहे. महिलांचे हे प्रमाण केवळ तीन टक्के आहे. शासनाकडून भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने जनजागृती सुरू आहे. भ्रष्टाचाराच्या किडीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेसुद्धा कामामध्ये गती आणत, कारवाया वाढविल्या आहेत. २0१४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १२४५ लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या, तर २0१५ मध्ये १२३४, २0१६ मध्ये ७६३ लाचखोरांना गजाआड केले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी तरुणाई पुढे येत आहे. आपल्या तक्रारींमधून भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची वृत्ती तरुणाईमध्ये दिसून येत आहे. २0१४ मध्ये लाचखोरांविरुद्ध तक्रार करणार्‍या युवकांची संख्या ३३८ होती, तर गतवर्षी २0१५ मध्ये त्यात आणखी वाढ झाली. २0१५ मध्ये ३६१, २0१६ मध्ये ३११ युवकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी नोंदविल्या. वृद्धांमध्ये मात्र लाचखोरांविरुद्ध तक्रारी करण्याबाबत उदासीनता दिसून येते. वृद्धांचे तक्रार करण्याचे प्रमाण केवळ पाच टक्के आहे. २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या युवकांमध्येही तक्रार करण्याचे प्रमाण १२ टक्के एवढे लक्षणीय असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

तक्रारदारांची वयानुसार वर्गवारी वय                          तक्रारदार २५ वर्षांपेक्षा कमी          १३२२६ ते ३५ वर्षे                ३११३६ ते ४५ वर्षे                २८९४६ ते ६0 वर्षे                १८0६0 वर्षांपेक्षा अधिक        ३७भ्रष्टाचारामध्ये महसूल व पोलीस खाते पहिल्या व द्वितीय स्थानावर आहे. २0१६ मधील सात महिन्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६0२ सापळे लावून, विविध विभागातील ७६३ लाचखोरांना अटक केली. यामध्ये महसूल विभागातील १७७, तर पोलीस विभागातील १६७ लाचखोरांना गजाआड करण्यात आले.