अकोला : पावसाळय़ातील पाण्यामुळे प्रचंड साचलेली घाण, डबक्यांमधील पाण्यामध्ये होत असलेली डासांची उत्पत्ती आणि वातावरणातील बदलामुळे गत महिन्यापासून जिल्हय़ात पसरलेली टायफाईड व डेंग्यूसदृश तापाची साथ अद्यापही कायम आहे. आरोग्य विभागाकडून कुठलेही ठोस प्रयत्न करण्यात येत नसून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.जिल्हय़ात अल्प प्रमाणात झालेला पाऊस आणि त्यानंतर कडाक्याचे उन्ह तापत असल्याने डेंग्यूसदृश तापाची साथ असून, या ह्यव्हायरलह्णने अनेकांना हैरान केले आहे. यावर आरोग्य विभागाने विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे; मात्र एक महिना ही साथ कायम असतानाही आरोग्य विभाग झोपेचे सोंग घेऊन आहे. डेंग्यूसदृश ताप आणि टायफाईडच्या रुग्णांवर नेमका कशाप्रकारे औषधोपचार करावा, याबाबत डॉक्टरही गोंधळात सापडले आहेत. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व महापालिका आणि नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेकडे कानाडोळा केल्यामुळेही या साथीच्या ता पाचा उद्रेक होत असून, यावर संबंधित विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. डेंग्यूसदृश व टायफाईडच्या तापाचे थैमान सुरूच असून, हा आजार डेंग्यूसदृश तापाचा व्हायरल असल्याचे प्रथम निदान करताना डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. हा आजार नागरिकांसाठी धोकादायक असल्याचेही डॉक्टरांच्या लक्षात आले असून, त्यावर उपाययोजना होत नसल्याने रुग्णालये खचाखच भरली आहेत. तळपत्या उन्हामुळे सा थीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून, ५ वर्षांआतील बालकांच्या शरीरात इन्फेक्शन होत असल्याचे बालरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
टायफाईड, डेंग्यूसदृश तापाचे थैमान
By admin | Updated: September 29, 2014 02:09 IST