शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षाआतील बालकांचा अ‍ॅनिमियाशी लढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 15:01 IST

आयर्नची कमतरता असलेल्या मुलांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

अकोला: महिलांसोबतच किशोरवयीन मुलींमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे; परंतु नॅशनल न्यूट्रिशन सर्व्हेच्या एका अहवालानुसार दोन वर्षांपेक्षा कमी वयाची मूलंही अ‍ॅनिमियाशी लढा देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरीरातील आयर्नची कमतरता असलेल्या मुलांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.अ‍ॅनिमियाशी लढा देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; मात्र अनेक मुलं अ‍ॅनिमियाने ग्रस्त आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या चिमुकल्यांसह किशोरवयीन मुलींमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. तर शरीरात आयर्नची कमतरता असलेल्या मुलांचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त असल्याचे धक्कादायक वास्तव नुकत्याच झालेल्या नॅशनल न्यूट्रिशन सर्व्हेतून समोर आले आहे. शहरी भागात चुकीच्या पद्धतीने दिल्या जाणाऱ्या आहारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गत काही वर्षांपासून चिमुकल्यांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. देशभरातील विचार करता २७ राज्यांमध्ये शालेय वयाच्या आतील मुलं, १५ राज्यांमध्ये शालेय मुलं, २० राज्यांमध्ये किशोरवयीन मुलांमध्ये अ‍ॅनिमिया असल्याचे समोर आले. तसेच १ ते ४ वर्ष वयोगटातील जवळपास ४९ मुलांमध्ये आयर्नची कमतरता असल्याचे वास्तव समोर आले आहे. आईच्या आरोग्यावर मुलाचे आरोग्य अवलंबून असते. सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया निम्म्याहून अधिक महिलांमध्ये पोषक घटकांची कमतरता आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांचाही योग्य विकास होत नाही. अ‍ॅनिमियामुळे मुलांचं आरोग्यच नाही, तर त्यांच्या शिक्षणावरदेखील परिणाम होतो.असे आहे अ‍ॅनिमियाचे प्रमाण

  • शालेय वयाच्या आतील मुले - ४१ टक्के
  • शालेय वयातील मुले - २४ टक्के
  • किशोरवयीन मुले -२८ टक्के

आयर्नची कमतरता

  • प्री-स्कूलर्स - ३२ टक्के
  • शालेय मुलं - १७ टक्के
  • किशोरवयीन मुलं - २२ टक्के

या आजाराचा धोका

  • मानसिक कार्यक्षमता आणि मेंदूच्या विकासावर दुष्परिणाम होतो आहे.
  • अशक्तपणा, थकवा, कमी उत्पादनक्षमता उद््भवते.
  • तसेच इन्फेक्शनचा धोकाही वाढतो आहे.
  • कमी हिमोग्लोबिन म्हणजे आयर्न, फोलेट, व्हिटॅमिन बी-12 अशा घटकांची कमतरता.
  • यामुळे मलेरिया, पोटातील जंतांसंबंधी आजारांचा धोका.
  • थॅलेसेमिया आणि सिकलसेलसारखे आजारही बळावू शकतात.

मुलांना पूरक आहार मिळत नाही. शहरी भागात फूड फॅशनचे प्रस्त वाढल्याने चिमुकल्यांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलांच्या पोषण आहाराकडे लक्षण देण्याची गरज आहे.- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य