शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची अमोरासमोर धडक, दाेन्ही दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:35 IST

मनात्री खुर्द : दाेन दुचाकींची अमाेरासमाेर धडक हाेऊन दाेन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले, तर एक जण किरकाेळ जखमी झाला. ...

मनात्री खुर्द : दाेन दुचाकींची अमाेरासमाेर धडक हाेऊन दाेन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले, तर एक जण किरकाेळ जखमी झाला. हा अपघात तेल्हारा तालुक्यातील मुख्य रहदारीचा मार्ग असलेल्या तेल्हारा-अडसूळ या मार्गावर २० फेब्रुवारी राेजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडला. पंचगव्हाण येथून लग्नाहून अडगाव येथील इसम गावाकडे परत जात होता, तर तेल्हाराकडून अडसूळकडे वाकोडी येथील इसम माेटारसायकलने जात हाेता. समाेरून आलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात एमएच ३० एएल ६४११ व एमएच ३० बीइ ०१३७ या दाेन्ही माेटारसायकल परस्परांना धडकल्या. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. पोलीस निरीक्षक दिनेश शेळके यांच्या मार्गदशनात पो.कॉ. निकेश सोळंके, सागर मोरे यांनी तातडीने घटनास्थळावर पोहाेचून जखमींना तत्काळ तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वृत्त लिहीपर्यंत जखमींची नावे कळू शकली नाहीत. तेल्हारा-अडसूळ या रस्त्याची दुरवस्था झाली असून, धुळीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.