शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजाराच्या नोटा पुन्हा चलनातून होताहेत कमी

By admin | Updated: April 4, 2017 01:32 IST

रिझर्व्ह बँकेकडे पाठविला राष्ट्रीयीकृत बँकांनी अहवाल

अकोला: हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाबंदीनंतर कॅशलेसचे प्रमाण वाढेल, अशी शक्यता होती; मात्र दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्यात. काही दिवस आर्थिक व्यवहार करताना, अनेकांनी आॅनलाइन आणि पॉस मशीनचा वापर केला; मात्र अशा व्यवहारांकडे आता धनदांडग्यापासून तर मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांनीच पाठ फिरविली. ज्या प्रमाणात रिझर्व्ह बँकेकडून दोन हजाराच्या नोटा दाखल झाल्यात त्या तुलनेत चलनात येणे बंद झाले आहे. तसा अहवाल राष्ट्रीयीकृत बँकांकडून रिझर्व्ह बँकेकडे पाठविला गेला आहे. बनावट नोटा पकडण्यासाठी आणि काळा पैसा चलनात आणण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आणली गेली. बंदी येताच मोठ्या प्रमाणात लोकांनी बँक, पेट्रोलपंप आणि औषधी दुकानात नोटा चालविल्यात. रिझर्व्ह बँकेला अपेक्षेप्रमाणे हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा प्राप्त झाल्या; नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहारास चालना मिळावी म्हणून पेट्रोल-डिझेलच्या खरेदीच्या प्रतिलीटर खरेदीवर ०.७ टक्के सूट दिली गेली. अनेकांना त्याचा लाभ मिळाला आणि अजूनही मिळतो आहे; मात्र ग्राहक आता पुन्हा रोख व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र या व्यवहारांमध्ये नोटांची संख्या अपेक्षेप्रमाणे नसल्याने नागरीक नोटा जमा करून ठेवत असल्याचे समोर आले आहे. ही बाब राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवहारात अधोरेखित होताच त्यांनी तसा अहवाल रिझर्व्ह बँकेकडे पाठविला आहे.दहाचा क्वाइन नाकारणे गुन्हाअलीकडे बाजारात आणि दैनंदिन व्यवहारात दहा रुपयांचा क्वाइन नाकारला जातो आहे. कोणतेही कारण नसताना दहा रुपयांचा क्वाइन नाकारणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय मुद्रेचा अवमान करणेप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो. व्यवहारात तसे कोणी करीत असेल तर तक्रार करा, असे मतही अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गायकवाड यांनी व्यक्त केले.नोटा दाबून ठेवण्याची मानसिकता नागरिकांच्या डोक्यातून जायला तयार नाही. त्यामुळे पुन्हा नोटा डम होत आहेत. अशा प्रकारामुळे देशाचे आणि बँकांचे चलन कमजोर होते. बँकांच्या दैनंदिन उलाढालीच्या नोंदीत मोठ्या नोटा थांबत असल्याचे अधोरेखित झाले आहे.-तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, अकोला.