आकोट (जि. अकोला): येथील रेल्वे स्टेशननजीक असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्डय़ात बुडून दोन शाळकरी चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १९ जुलै रोजी सायंकाळी ६.३0 वाजताच्या सुमारास घडली. रेल्वे प्रशासनाने रेल्वे क्वॉर्टरनजीक खड्डा खोदलेला आहे. या खड्डय़ात पावसाचे पाणी साचलेले आहे. या ठिकाणी तीन मित्र गेले असता, विराज संजय देशमुख व हितेश सुनील जेस्वाणी या दोन १२ वर्षीय मुलाचा खड्डय़ात बुडून मृत्यू झाला. ही बातमी कळताच नागरिक मोठय़ा संख्येने धाव घेतली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
By admin | Updated: July 20, 2016 02:08 IST