शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात आणखी दोन पॉझिटिव्ह; कोरोनाबाधित रुग्णाची पत्नी, दुकानातील कामगारालाही लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 11:34 IST

रुग्णाची पत्नी आणि त्याच्या प्रतिष्ठानात कार्यरत असलेल्या एका कामगारासही या कोविड-१९ आजाराची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आले.

ठळक मुद्देसिंधी कॅम्पमधील ४१ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते.या रुग्णाच्या निकटसंपर्कातील व्यक्तींची आरोग्यविभागाकडून तपासणी करण्यात आली. या व्यक्तीची पत्नी आणि त्याच्या दुकानातील कामगार ३१ वर्षीय युवक (भीमनगर)या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह.

अकोला : जगभर थैमान घालणाºया कोरोना विषाणूने आता अकोला शहरात चांगलेच बस्तान मांडले असून, रविवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या सिंधी कॅम्प परिसरातील एका रुग्णाची पत्नी आणि त्याच्या प्रतिष्ठानात कार्यरत असलेल्या एका कामगारासही या कोविड-१९ आजाराची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आले. या दोघांचेही कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आले. हे दोन रुग्ण वाढल्यामुळे कोरोनाबाधीतांचा पॉझिटिव्ह आकडा ९ झाला आहे. दरम्यान, बैदपुरा भागातील एका तीन वर्षीय बालकाचा फेरतपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंता वाढली आहे.सिंधी कॅम्पमधील  ४१ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले होते. त्यानंतर या रुग्णाच्या निकटसंपर्कातील व्यक्तींची आरोग्यविभागाकडून तपासणी करण्यात आली. त्यापैकी या व्यक्तीची पत्नी आणि त्याच्या दुकानातील कामगार ३१ वर्षीय युवक    (न्यू भीमनगर) या दोघांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी एकून ४२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी तीन पॉझिटिव्ह असून, ३९ अहवाल निगेटिव्ह आहेत. तीन पॉझिटिव्ह अहवालात बैदपुराभागातील एका तीन वर्षीय बालकाचा फेरतपासणीच्या अहवालाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटिव्ह अहवालांची संख्या १९ झाली असून, प्रत्यक्षात सद्या नऊ जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या