शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू; ८१ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:56 IST

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५२१८ झाली आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७५ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ८१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५२१८ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २४६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ८१ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६५ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये २८ महिला व ५३ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये पिंजर येथील सात, दापूरा व मोठी उमरी येथील प्रत्येकी सहा, नागे लेआऊट येथील पाच, श्रावंगी प्लॉट, बार्शिटाकळी व रेडवा ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी चार, कौलखेड, मलकापूर, गणेश नगर व रिंग रोड येथील प्रत्येकी तीन, खडकी, जवाहर नगर व पिंपळगाव चंभारे येथील प्रत्येकी दोन, आदर्श कॉलनी, आळंदा ता. बार्शिटाकळी, आगर, शिवनी, मुर्तिजापूर, खिक्रीयन कॉलनी, अन्वी मिजार्पूर, लहान उमरी, मरोडा ता. अकोट, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, जीएमसी, डाबकी रोड, जूने शहर, तुंलगा ब्रू. ता. पातूर, सुधीर कॉलनी, वृंदावन कॉलनी, बेलखेड ता. तेल्हारा, गौरक्षण रोड, जठारपेठ, गोरेगाव, दत्त कॉलनी, देवी खदान, योगी चौक, पारस, चान्नी, आरटीओ रोड व जामवसू ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.जुने शहर व चिखलगावातील दोघांचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या दोन रुग्णांचा शुक्रवारी मृत्यू झाला. यामध्ये चिखलगाव येथील ७५ वर्षीय पुरुष व अकोल्यातील जुने शहरातील पोळा चौक भागातील ७० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दोघांनाही अनुक्रमे ८ सप्टेंबर व ७ सप्टेंबर रोजी उपारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.११८५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५२१८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३८५८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ११८५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला