शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

 आणखी दोघांचा मृत्यू; २३ नवे पॉझिटिव्ह, १७४ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 18:51 IST

CoranaVirus in Akola दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २४१ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शुक्रवार, २ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील एक व बार्शीटाकळी तालुक्यातील एक अशा दोघांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २४१ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७५७२ वर गेली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री आणखी १०६ आणि शुक्रवारी ६८ अशा एकूण १७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे ३५८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३३५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ व डोंगरगाव येथील प्रत्येकी तीन जणांसह संतोष नगर येथील दोन, कौलखेड, मलकापूर, लक्ष्मी नगर, भागवतवाडी, मुरारका मेडिकल, देशमुख फाईल, वाडेगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी राधाकिसन प्लॉट येथील दोन, कौलखेड, जानोरी, शिवनगर, अंबिका नगर, खडकी, बार्शीटाकळी नवीन बसस्टँड जवळ येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.गीतानगर, तिवसा येथील दोघे दगावलेकोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, शुक्रवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये गीतानगर येथील ७२ वर्षीय पुरुष असून, त्यांना २३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. तिवसा येथील ६२ वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. त्यांना १९ सप्टेंबर रोजी भरती करण्यात आले होते.१७४ जणांची कोरोनावर मातगुरुवारी रात्री अकोला अ‍ॅक्सीडेंट क्लिनीक येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून पाच आणि होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १०० अशा एकूण १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २४, कोविड केअर सेंटर अकोला येथून १५, उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून चार, अवधाते हॉस्पीटल मुर्तिजापूर येथून तीन, सुर्याचंद्रा हॉस्पीटल येथून एक, आयुर्वेदीक हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रेजीन्सी येथून नऊ, तर हॉटेल स्कायलार्क येथून सहा अशा एकूण ६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१,१२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,५७२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६२०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,१२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला