शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून दोन ठार; आसेगाव व पांगरीत शोककळा

By admin | Updated: April 11, 2015 01:46 IST

रोजी मालेगाव व रिसोड तालुक्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला.

वाशिम/मालेगाव : जिल्ह्यात १0 एप्रिल रोजी मालेगाव व रिसोड तालुक्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. यादरम्यान मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे व रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील दोन जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. तालुक्यातील पांगरी नवघरे येथील १७ वर्षीय विठ्ठल माधव तागड हा अकराव्या वर्गात शिकणारा युवक शेतात बकर्‍या चारत असताना विज अंगावर कोसळल्याने जागीच ठार झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. इतर दोघे जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. पांगरी नवघरेच्या उत्तरेकडे असलेल्या धरणाच्या बाजूच्या शेतामध्ये विठ्ठल तागड, विष्णू नवघरे आणि वामन तुकाराम नवघरे हे बकर्‍या चारण्यासाठी गेले होते. दुपारी साडे ३ वाजताच्या सुमारास अचानक वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. त्यामध्ये वीज अंगावर कोसळल्याने विठ्ठल तागड हा जागीच ठार झाला, तर विष्णू नवघरे (४0)े गंभीर जखमी झाले. वामन नवघरे (४५) हे किरकोळ जखमी झाले. जखमी विष्णू नवघरे यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले, तर वामन नवघरे यांच्यावर मालेगाव येथील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याला घरी पाठविण्यात आले आहे. या घटनेमध्ये त्यांच्याकडील चार बकर्‍यासुद्धा ठार झाल्या आहेत. पुढील तपास ठाणेदार तट याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. अन्य एका घटनेत रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १६ वर्षीय रामा लोणकर या अकराव्या वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर वीज कोसळली. त्यामध्ये तो ठार झाल्याची घटना १0 एप्रिलला ५.३0 वाजता घडली. गावानजीक असलेल्या शेतातून तो घरी परत येत होता. वाटेतच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याने गावाकडे येण्यास सुरुवात करतानाच त्याच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्याचा तेथेच मृत्यू झाला.