अकोला: किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना बुधवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास आकोट फैला तील साबरिया चौकात घडली. या प्रकरणी आकोट फैल पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आकोट फैलातील इंदिरानगरात राहणारे आदिल अहमद अब्दुल हकीम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शेख जमील शेख गणी याने त्यांचेसोबत वाद घातला आणि तलवारने वार करून जखमी केले. आदिल यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी शेख जमील शेख गणी याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२६, आर्म अँक्ट कलम ४, २५ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शेख जमील यांच्या तक्रारीनुसार, आदिल अहमद अब्दुल हकीम याने मारहाण करून जखमी केले. त्यामुळे पोलिसांनी आदिल अहमदवर भादंवि कलम ३२६, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दोन गटात हाणामारी; दोघे गजाआड
By admin | Updated: April 17, 2015 01:56 IST