शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

१२ बैलजाेड्यांची चाेरी करणारे बापलेक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 20:04 IST

Crime News पाेलिसांनी या दाेघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अकाेला : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून बैलजाेड्या माेठ्या प्रमाणात चाेरीला जात असून, पाेलीस तपास मात्र शून्य असल्याचे वृत्त ‘लाेकमत’ने प्रकाशीत केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने बैलजाेड्या चाेरणाऱ्या बापलेकाला अटक केली. त्यांनी तब्बल १२ बैलजाेड्या चाेरी केल्याची कबुली दिली असून, हे बैल बाेरगाव मंजू येथील कत्तलखान्यात विक्री केल्याचेही समाेर आले आहे. त्यामुळे पाेलिसांनी या दाेघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बाेरगाव मंजू पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसाे बढे येथील रहिवासी गजानन नरसिंग डाबेराव व त्याचा एक अल्पवयीन मुलगा यांनी बाेरगाव मंजू, एमआयडीसी, आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीत बैलजाेड्या चाेरी केल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कसून चाैकशी केल्यानंतर त्याने १२ बैलजाेड्या चाेरी केल्याची कबुली दिली. यामधील नऊ बैलजाेड्या त्याने बाेरगाव मंजू पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून चाेरी केल्या तर दाेन बैलजाेड्या मूर्तिजापूर ग्रामीन पाेलीस स्टेशन आणि एक बैलजाेडी एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून चाेरी केल्याचे समाेर आले. पाेलिसांनी या बैलजाेड्यांची माहिती विचारली असता या बापलेकाने या बैलजाेड्या बाेरगाव मंजू येथील कसाई शेख सद्दाम शेख गणी याला कत्तलीसाठी विकल्याची माहिती आराेपींनी दिली. कसाई शेख सद्दाम याने या १२ बैलजाेड्यांची कत्तल केल्याची माहिती समाेर आली आहे. या बैलजाेड्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशात डाबेराव याने एक एमएच ३० बीएम ५२४६ ही गाडी विकत घेऊन उर्वरित पैसे घराचे बांधकामावर खर्च केल्याचे सांगितले. कसाई शेख सद्दाम शेख गणी यास ताब्यात घेतले असता त्याने बैलांची कत्तल करून त्याचे मास विक्री केल्याची कबुली दिली. या १२ बैलजाेड्यांची किंमत सुमारे दाेन लाख ३३ हजार रुपये असल्याची माहिती आहे. या चाेरट्यांकडून एमएच ३० बीएम ५२४६ किंमत ८० हजार व चार मोबाइल फोन किंमत ३० हजार रुपये, एक लोखंडी टॉमी व कत्तल करणारा आरोपीकडून कत्तलीचे साहित्य पुराव्याकामी जप्त केली आहे. असा एकूण चार लाख ४३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अतुल अरुण सरदार यांनी बैलजाेडी चाेरीची तक्रार दिली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी तपास करताना या चाेरट्यांना अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख शैलेश सपकाळ, राजपाल ठाकूर, गणेश पांडे, नितीन ठाकरे, शंकर डाबेराव, संदीप काटकर, लीलाधर खंडारे, रवि पालीवाल, विशाल मोरे, संदीप तवाडे, रोशन पटले, सुशील खंडारे, सतीश गुप्ता, गीता अवचार, चालक प्रवीण कश्यप, अनिल राठोड व सायबर सेलचे गोपाल ठोंबरे, नीलेश चाटे व गणेश सोनोने यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी