शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीची अडीच पटीने झेप!

By admin | Updated: December 4, 2014 23:57 IST

नोव्हेंबर महिन्यातील कारवाई : १११ सापळे यशस्वी

संतोष वानखडे / वाशिमराज्यात लाचखोरीचा आलेख गतीने झेपावत असल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीने शिक्कामोर्तब केले आहे. नोव्हेंबर २0१३ मध्ये राज्यात ४५ सापळे यशस्वी झाले होते. याऊलट नोव्हेंबर २0१४ मध्ये तब्बल १११ सापळ्यातून १४४ लाचखोरांना आरोपी करण्यात आले आहे.झटपट श्रीमंत होण्याच्या स्पर्धेने प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता कधीचीच गायब झाली. लाचखोरी आणि भ्रष्टाचार देशाची अर्थव्यवस्था पोखरत आहे. याविरोधात अनेकवेळा आवाज उठविण्यात आला; मात्र लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच असल्याचा अनुभव घरातून बाहेर पडल्यावर अनेकांना पदोपदी येत आहे. ह्यलाचेह्णच्या मागणीला कंटाळून किंवा लाचखोरांना धडा शिकविण्यासाठी अर्जदार हा अँन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार नोंदवितो. प्राप्त तक्रारीवरून आतापर्यंत हजारो जणांवर लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल झाले आहेत. नोव्हेंबर २0१३ या एका महिन्यात प्राप्त तक्रारींवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात ४५ कारवाया यशस्वी करून ५७ लाचखोरांना जेरबंद केले होते. या आकडेवारीची तुलना नोव्हेंबर २0१४ या एका महिन्याशी केली असता, लाचखोरीत तब्बल अडीच पट वाढ झाल्याचे स्पष्ट होते. नोव्हेंबर २0१४ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १११ कारवाया करून १४४ लाचखोरांविरूद्ध गुन्हे दाखल केले. *डिसेंबरमध्ये आठ पट वाढ..१ ते ३ डिसेंबर या तीन दिवसाची तुलना करता, २0१३ च्या तुलनेत २0१४ मध्ये तब्बल आठ पट वाढ झाल्याचे दिसून येते. १ ते ३ डिसेंबर २0१३ मध्ये राज्यात केवळ दोन कारवाया यशस्वी झाल्या होत्या. दोन कारवायामधून तिघांना जेरबंद केले होते. १ ते ३ डिसेंबर २0१४ मध्ये तब्बल १६ कारवाया करण्यात आल्या असून २0 जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची साक्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची आकडेवारी देत आहे.*अमरावती विभागात दुपटीने वाढअमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १ जानेवारी ते ३ डिसेंबर २0१३ आणि १ जानेवारी ते ३ डिसेंबर २0१४ या दरम्यानच्या तुलनात्मक आकडेवारीवर नजर टाकली तर लाचखोरीच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे स्पष्ट होते. १ जानेवारी ते ३ डिसेंबर २0१३ यादरम्यान अमरावती विभागात लाचखोरीच्या एकूण ६0 कारवायांची नोंद आहे. १ जानेवारी ते ३ डिसेंबर २0१४ यादरम्यान लाचखोरीच्या तब्बल १२६ प्रकरणांची नोंद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दप्तरी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ३४ प्रकरणांची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. त्याखालोखाल अमरावती २७, अकोला २४, बुलडाणा २२ तर वाशिम जिल्ह्यात १९ कारवाया करण्यात आल्या.