शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तुषार पुंडकर हत्याकांड : मध्य प्रदेशच्या दिशेने तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 12:00 IST

आरोपी मध्य प्रदेशमध्ये पसार झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी धागेदारे जुळविण्यास सुरुवात केली असून, एक पथक मध्य प्रदेशच्या दिशेने तपास घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी अमरावती परिक्षेत्रातील कुशल पोलीस अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे.अकोटपासून मध्य प्रदेशची सीमा जवळ असल्याने आरोपी मध्य प्रदेशमध्ये पसार झाल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी पोलीस महासंचालकांनी समांतर पथक गठित केले असून, पथकामध्ये अकोट शहरात यापूर्वी सेवा दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. याशिवाय, स्थानिक गुन्हे शाखा आणि इतर सहा पथकेही गठित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस तुषार पुंडकर यांच्या फोन कॉल्स हिस्ट्रीच्या माध्यमातून सुगावा जुळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेल्याने अकोट शहर पोलिसांनी घटनास्थळाजवळचा दवाखाना, बँकेचे सीसी फुटेज बघितले; परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.तुषार कोणाची ओळख करून देणार होते?तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार होण्याच्या दोन तासपूर्वी त्यांची भेट संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले आणि पवन महल्ले यांच्याशी झाली होती. या भेटीसंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांनाही माहिती दिली असून, याचा फायदा तपासात होऊ शकतो. त्यानुसार, संभाजी ब्रिगेडचे पंकज जायले व पवन महल्ले हे शुक्रवारी अकोट येथील अभ्यासिकेचे उद्घाटन आटोपून सत्यपाल महाराज यांच्या मातोश्रींच्या अंत्यदर्शनासाठी जात असताना रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांची भेट तुषार पुंडकर यांच्याशी झाली. दर्यापूर रोडवर पुंडकर यांची गाडी बंद पडल्याने ते रस्त्यावर उभे होते. त्यांनी पुंडकर यांना गाडीत बसण्याची विनंती केली; मात्र पुंडकर यांनी नकार देत चहा घेण्याचा आग्रह केला. दरम्यान, पुंडकर यांनी दोन मित्रांची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या दोघांनीही ओळख करून घेणे टाळले व ते तिघेही दुचाकीवर निघून गेले.

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट