शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सबर्मसिबल पंपांचे वीज कनेक्शन बंद करा!

By admin | Updated: November 6, 2014 01:09 IST

अकोला मनपा आयुक्तांचे वीज कंपनीला आदेश.

आशिष गावंडे / अकोलापाण्यासाठी दारोदारी वणवण भटकणार्‍या गोरगरीब नागरिकांना सबर्मसिबल पंप, हातपंपामुळे दिलासा मिळाला. मनपा प्रशासनाला मात्र यासंदर्भात काहीही घेणे-देणे नसल्यामुळे काटकसर करण्याच्या उद्देशातून शहरातील संपूर्ण सबर्मसिबल पंपांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी वीज वितरण कंपनीला दिले. आयुक्तांच्या निर्णयामुळे नगरसेवकांसह अकोलेकरांच्या पायाखालची वाळू सरकली असून, प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांच्या भुवया उंचावल्या आहेत.राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत अकोला मनपाचा आस्थापना खर्च ६४ टक्क्यांच्या वर आहे. आस्थापना खर्चात अवाढव्य वाढ असल्यामुळे मागील बारा वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील पात्र ४२ लाभार्थी सेवेत सामावून घेण्यासाठी ह्यवेटिंगह्णवर आहेत. तरीसुद्धा प्रशासन कंत्राटी कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे आश्‍वासन देत आहे. अर्थातच, एकीकडे कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित केल्यास त्यांच्या वेतनाचा भार मनपाला उचलणे शक्य नसल्याची स्थिती असताना, दुसरीकडे मात्र प्रशासनाने काटकसरीचे अजब गजब धोरण स्वीकारले आहे.गोरगरीब नागरिकांच्या सुविधेसाठी प्रभागात उपलब्ध असलेले सबर्मसिबल पंप, जेटपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश आयुक्त डॉ.कल्याणकर यांच्यासह उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी वीज कंपनीला ऑगस्ट महिन्यात दिल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. आजरोजी शहराच्या विविध भागात सुमारे ६00 सबर्मसिबल पंप आहेत. यातील २00 सबर्मसिबल पंपांचे केवळ चार लाखाचे देयक मनपाला अदा करावे लागते. अवघ्या चार लाखांच्या काटकसरीसाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून, यानंतरही सबर्मसिबल पंपांचे वीज कनेक्शन कायम असल्यास त्याचे देयक मनपा अदा करणार नसल्याचे कंपनीला ठासून सांगण्यात आले.