शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तूर तेजीत! अकोला, अकोटात ११,५०० रुपये प्रति क्विंटल

By रवी दामोदर | Updated: August 19, 2023 16:37 IST

यंदा सुरुवातीपासूनच तुरीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे.

अकोला : यंदा सुरुवातीपासूनच तुरीच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीला मागणी वाढताच सातत्याने तुरीचा दर वाढत असून, शनिवार, दि. १९ ऑगस्ट रोजी अकोला बाजार समितीसह अकोट बाजार समितीत तुरींनी विक्रम गाठला.  पहिल्यांदा तुरीला प्रति क्विंटल ११,५०० हजार रुपयांवर पोहोचली आहे.  परंतु आता शेतकऱ्यांजवळील साठवणूक केलेली तूर संपल्यानंतर दरवाढ झाली असल्याने वाढीव दराचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होणार असल्याची चिन्हे आहेत.

सध्या बाजार समितीत तुरीची आवक कमी झाली व मागणी वाढली आहे. परदेशातून तुरीची आयात कमी झाली आहे. अशा परिस्थितीत नवीन तूर बाजारात यायला सहा महिन्यांचा कालावधी आहे. याशिवाय गतवर्षी झालेल्या अतिपावसाने तुरीच्या उत्पादनात कमी आलेली आहे. देशात सगळीकडे हीच परिस्थिती असल्याने तुरीची मागणी वाढताच भाव कडाडले आहेत. येथील बाजार समिती एक प्रकारे तुरीचे हब बनली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक भाव मिळत असल्याने व इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त भाव असल्याने येथे तुरीची मोठी आवक राहते; परंतु सध्या शेतकऱ्यांजवळ साठवणूक केलेली तूर नसल्याने बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने दरवाढ झालेली आहे.

यंदाही अतिवृष्टीचा फटका, उत्पादनावर परिणामजुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे ४४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. पावसाचे पाणी शेतात थांबल्याने तुरीचे पीक नष्ट झाले आहे. याशिवाय मान्सूनच्या विलंबाने तीन आठवडे पेरण्या रखडल्या होत्या. त्यामुळे कपाशीची क्षेत्रवाढ झाली. पर्यायाने सोयाबीनमध्ये आंतरपीक असणारे तुरीचे क्षेत्र काही प्रमाणात कमी झाले आहे. पावसाचा खेळखंडोबा पाहता यंदा तुरीच्या उत्पादनात सरासरी कमी येण्याची शक्यता आहे.

सध्या बाजार समितीत तुरीची आवक कमी झाली आहे. सध्या शेतकऱ्यांजवळही माल नाही, नवीन तुरीला सहा महिने आहेत. त्यामुळे मागणी वाढून तुरीची भाववाढ झाली आहे. काही दिवस तुरीच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज आहे. - चंद्रशेखर खेडकर, अध्यक्ष, व्यापारी-अडतिया मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला.

टॅग्स :Akolaअकोला