शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी होणार भेंडवळची घट मांडणी

By admin | Updated: April 20, 2015 01:44 IST

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची घटमांडणीची ३00 वर्षाची परंपरा : खरिप, रब्बी हंगामाविषयी शेतक-यांमध्ये उत्सुकता.

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): ३00 वर्षाची परंपरा लाभलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची घटमांडणी मंगळवार अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सुर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. घटातील रात्रभरात झालेल्या बदलाचे अवलोकन करून २२ एप्रिल रोजी सुर्योदयासमयी यंदाच्या हंगामाविषयी भाकीत वर्तविले जाईल.हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरणार्‍या घटमांडणीची सुरूवात केली. ती परंपरा सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या भेंडवळच्या वाघ कुटुंबियांनी आधुनिक युगातही जपली आहे. या विधीसाठी आवश्यक नियमांचे काटेकोरपणे पालन करून चंद्रभान महाराजांचे वंशज व स्व. रामदास महाराज वाघ यांचे पुत्र पुंजाजी महाराज २१ एप्रिल रोजी सायंकाळी गावाच्या पुर्वेस बसस्टॅण्ड लगतच्या शेतात सुर्यास्ताचे वेळी आपल्या सहकार्‍यांसमवेत घटाची मांडणी करणार आहेत. शेतात गोलाकार घट तयार करून त्यामध्ये खरीप व रब्बी हंगामात येणारी जी पिके आहेत, ती १८ प्रकारची धान्ये गोलाकार पद्धतीने मांडली जातात. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरूपातील पुरी, समुद्राचे प्रतिक घागर त्यावर असलेले पापड, भजा, वडा, पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतिकात्मक मातीची ढेकळे, पानसुपारी ही सर्व प्रतिकात्मक खाद्य वस्तु व धान्याची मांडणी होईल. रात्री घटामध्ये नैसर्गिकरित्या ज्या घरामध्ये जे काही बदल घडून येतात, त्यावर दुसर्‍या दिवशी पुढील हंगामाचे पीक पावसाचे, देशाचे, राजकीय तथा नैसर्गिक संकटांची चाहुल देणारे भाकीत वर्तविले जाते. भेंडवळच्या घटमांडणीनंतर विदर्भातीलच नव्हे तर राज्यातील शेतकरी वर्ग पेरणीची दिशा ठरवितो.