शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम वर्‍हाडावर तिबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:22 IST

अकोला: यावर्षी पावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. पेरणीचा पूरक कालावधी ओलांडल्यानंतर लाखो शेतकर्‍यांनी पेरणी केली. २५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणी करण्यात आली. तेथील उत्पादन आता ५0 टक्के घटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता पावसाशिवाय पर्याय नसल्याने शेतकर्‍यांचे डोळे नभाकडे लागली आहेत. 

ठळक मुद्देपावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीचे संकट२५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणीउत्पादन ५0 टक्के घटण्याची शक्यता 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यावर्षी पावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. पेरणीचा पूरक कालावधी ओलांडल्यानंतर लाखो शेतकर्‍यांनी पेरणी केली. २५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणी करण्यात आली. तेथील उत्पादन आता ५0 टक्के घटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आता पावसाशिवाय पर्याय नसल्याने शेतकर्‍यांचे डोळे नभाकडे लागली आहेत. पश्‍चिम विदर्भात सरासरी ३२ लाख ७५ हजार  हेक्टर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले होते. यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे भाकीत हवामानशास्त्र विभागाने केल्याने सर्वच स्तरावर कृषी निविष्ठा ते पेरणी, असे नियोजन करण्यात आले होते. तथापि, पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या. १५ जुलैपर्यंत राज्यासह विदर्भात ५0 टक्क्यांच्यावर पेरण्याची आकडेवारी सरकली नव्हती. १५ जुलैनंतर राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी आपत्कालीन पीक पेरणी केली आहे.१५ जुलैपर्यंत कापूस, तूर, सोयाबीन पिकाच्या पेरणीची ही वेळ होती; परंतु शेतकर्‍यांनी २५ ते २७ जुलैपर्यंत पेरणी केली. त्यामुळेच १५ जुलैनंतर ७ ते १0 दिवसांत ४0 ते ४५ टक्के पेरणी झाली आहे. पश्‍चिम विदर्भात पेरणीचा आकडा आजमितीस ९२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अकोला जिल्ह्यात १५ ते २0 जुलैपर्यंत केवळ ५३ टक्के पेरणी झाली होती. १५ जुलैनंतर तुरळक पावसाला सुरुवात झाल्याने शेतकर्‍यांनी धाडसाने पेरणी केली. जवळपास या ७ ते ८ दिवसांत ४0 टक्क्यांच्यावर पेरणी करण्यात आली; पण तेव्हापासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चक्रावून गेला आहे. तापमान वाढल्याने पिके कोमेजली आहेत. उशिरा पेरणी केलेली पिके ही दोन पानांवर आहेत. तापमानाचा मार सहन होत नसल्याने या पिकांनी माना टाकल्या आहेत.

१५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात ५0 टक्के घट येते, हे सूत्रच आहे. आठ दिवस पाऊस लांबल्यास १0 टक्के उत्पादनात घट होते, तसेच २0 ते २५ दिवस लांबल्यास ४0 टक्क्यांवर उत्पादनात घट होत असते. काही पिकात ही घट ३0 ते ४0 टक्के असते.- डॉ. दिलीप एम. मानकर,संचालक (संशोधन), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.