अकोला - खदान परिसरातील कैलास टेकडी येथील रहिवासी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत महिला ७0 टक्के जळाली असून, खदान पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांसह एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.कैलास टेकडी येथील रहिवासी शोभा शेषराव होनाडे (२८) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी श्निवारी रात्री अल्का, रत्ना व बाली यांचासह रमेश घुगेने वाद घा तला. तिने स्पष्टीकरण दिल्यानंतरही ते काहीही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हते. वाद वाढल्यानंतर या चौघांनी महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले. यामध्ये शोभा ७0 टक्के जळाली असून तिच्यावर सर्वोपचारमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खदान पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
महिलेला जाळण्याचा प्रयत्न
By admin | Updated: September 15, 2014 02:03 IST