शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीच्या धाकावर व्यापा-याला लुटण्याचा प्रयत्न

By admin | Updated: August 9, 2016 02:23 IST

शेगाव येथील घटना; व्यापा-याची प्रसंगसावधनता; एका लुटारूस नागरिकांनी पकडले!

शेगाव (जि. बुलडाणा): एका व्यावसायिकाला बंदुकीच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न झाला; मात्र दक्ष नागरिकांच्या मदतीने सशस्त्र लुटारूंचा पाठलाग करून एका लुटारूस बंदुकीसह पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही चित्तथरारक घटना रविवारी रात्री उशिरा घडली. रविवारी रात्री राकेश काशेलानी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून त्यांच्या दुचाकीने घरी परतत असताना अज्ञात दोन दुचाकीस्वारांनी त्यांना आवाज देऊन रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्या दुचाकीस्वारांनी पाठलाग करून काशेलानी यांच्या डोळय़ात मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न केला; मात्र सुदैवाने त्यांच्या डोळय़ात मिरची पूड गेली नाही. काहीतरी अघटित घडणार याचा नेम आल्याने काशेलानी यांनी आपल्या वाहनाची गती वाढविली; मात्र राकेश काशेलानी यांची गाडी स्लिप झाली व काशेलानी घसरून पडले. या संधीचा फायदा घेत दोन लुटारूंपैकी एकाने काशेलानी यांना काठीने मारहाण केली; मात्र काशेलानी यांनी प्रतिकार केला. हे पाहून दुसर्‍या लुटारूने त्याच्या जवळील बंदूक काढली; मात्र काशेलानी यांनी यावेळीसुद्धा प्रसंगावधान राखत त्याच्या हाताला झटका बंदूक खाली पाडली. दरम्यान, परिसरातील माणसेही घटनास्थळावर पोहचली. त्यांनी आरडाओरडा केला; मात्र दरम्यान दोघांपैकी एक जण दुचाकी घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.पोलिसांची गाडी घटनास्थळी तत्काळ पोहचली व त्यांनी नागरिकांच्या ताब्यातील लुटारूला ताब्यात घेतले. पोलीस तपासात लटारूंची नावे अकोला जिल्ह्यातील दिलीप प्रभाकर साळुंके आणि राजू इंगळे अशी पुढे आली आहे. राजू इंगळे हा सध्या फरार असून पोलीस पथक त्याच्या शोधात रवाना झाले. आरोपीकडून एक बंदुक, चार जिवंत काडतुसे व एक चाकू असे हत्यार जप्त करण्यात आले आहे. घटनेतील आरोपींविरुद्ध कलम ३९४, ३२५, ४२५ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार रंगेहात पकडलेल्या आरोपीकडून बुलडाणा जिल्ह्यात घडलेल्या लुटमारीच्या घटनांची माहिती मिळण्यास मदत होणार असून पोलिसांचे पथक दुसर्‍या आरोपीच्या शोधात रवाना झाले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून अकोला जिल्ह्यात त्यांच्याविरुद्ध अनेक गुन्हे दखल आहेत.