मूर्तिजापूर, दि. ३१- भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने एकजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील अनभोरा गावाजवळ ३१ मार्च रोजी रात्री ८.३0 वाजता घडली. प्राप्त माहितीनुसार, बुलेट क्र. एमएच ३0 एएम ४९६४ ने दोघे जण अकोलाकडे येत होते. दरम्यान, अनभोरा गावाजवळ भरधाव जात असलेल्या ट्रक क्र. एमएच १८ एए ८७६२ ने बुलेटला जोरदार धडक दिली. यामध्ये अमोल गजानन पाकडे रा. अकोला हा जागीच ठार झाला, तर मयूर गजानन झोड हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे हे.काँ. सुभाष उघडे, अनिल राठोड, कुमरे, मुळे आदींसह शहर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.
ट्रकची दुचाकीस धडक; एक ठार
By admin | Updated: April 1, 2017 02:48 IST