उरळ : भरधाव ट्रकने मालवाहू टाटा-४०७ ला धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ मे रोजी सकाळी ७ वाजता कवठा फाट्यावर घडली. कवठा येथून टाटा-४०७ क्र. एमएच ३० एबी ९४३ अकोलाकडे जात होता. दरम्यान, कवठा फाट्यावर शेगावकडे जात असलेल्या ट्रक क्र.एमपी ०९ एचजी ६९४१ ने टाटा ४०७ ला जबर धडक दिली. यामध्ये योगेश घ्यारे व चेतन घ्यारे हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी तेजराव घ्यारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरळ पोलिसांनी ट्रकचालक सचिन घोरे रा.परतवाडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ट्रकचालकास अटक करण्यात आली. (
ट्रकची धडक; दोन गंभीर
By admin | Updated: May 12, 2017 08:18 IST