शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकवर आदळली कार दोघे जागीच ठार

By admin | Updated: July 31, 2015 01:58 IST

माना शिवारातील घटना: एक गंभीर

मूर्तिजापूर/जामठी बु. (जि. अकोला): अकोल्याकडून अमरावतीकडे भरधाव जाणारी हय़ुंडाई आयटेन कार २९ जुलैच्या रात्री १२.३0 ते १ वाजताच्या सुमारास माना गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. या अपघातातील जखमीला अकोल्यास हलविण्यात आले आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर माना गावापासून अर्धा कि.मी.अंतरावर २९ जुलै रोजी दोन ट्रकचा अपघात झाला होता. तेथे उभ्या असलेल्या एम.एच.४0-५९९३ क्रमांकाच्या ट्रकवर अकोल्याकडून अमरावतीकडे भरधाव जाणारी एम.एच.३0 पी.३२३0 क्रमांकाची हय़ुंडाई आयटेन कार २९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर जाऊन आदळली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे अकोल्यातील आकोट फैलमधील रहिवासी व अकोला तालुक्यातील शिलोडाचे उपसरपंच नासीरखाँ जोरावरखाँ (३0), अकोल्यातील रामदासपेठ भागातील रहिवासी शशांक विनायक कांगटे (२५) हे दोघे जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत कारमधून प्रवास करणारे शिलोडाचे सरपंच व शासकीय कंत्राटदार दिलीप पाटील सरोदे (३0) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात अपघातग्रस्त हुय़ंडाई आयटेन कारच्या दर्शनी भागाचा पार चेंदामेंदा झाला. अपघातातील जखमीला तातडीने अकोल्यास हलविण्यात आले. या अपघातातील दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात ३0 जुलै रोजी दुपारी करण्यात आले. त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. अपघातस्थळाचा पंचनामा पोलिसांनी केला.