शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-कंटेनरची धडक; चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:35 IST

कुरूम : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील कुरूमनजीक ज्ञानेश्वर मोंढे यांच्या शेताजवळ ट्रक-कंटेनरची अमोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक ...

कुरूम : राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरील कुरूमनजीक ज्ञानेश्वर मोंढे यांच्या शेताजवळ ट्रक-कंटेनरची अमोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी राेजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

अकोल्यावरून अमरावतीकडे कपड्याच्या गठाणी घेऊन जाणारा कंटेनर क्र. एनएल ०१ एसी ८६४६ची व अमरावतीकडून अकोल्याकडे जाणारा ट्रक सीजी ०४ जेडी २४२९ ची समोरासमोर धडक झाली. यात कंटेनरचा चालक विशालकुमार प्रसाद रा. बिहार याच्या पायाला मार लागल्याने हा गंभीर जखमी झाला.

या घटनेची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील, हे.कॉ. दिलीप नागोलकर, ना. पो.कॉ. नंदकिशोर टिकार, पो.कॉ. विनोद तायडे, नीलेश इंगळे, विठ्ठल राठोड, वैभव येळने, गृहरक्षक रामेश्वर वानखडे यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरच्या कॅबिनमध्ये फसलेल्या गंभीर जखमी चालकाला काढून १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने उपचाराकरिता अमरावती येथील इर्विन जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी ट्रक व कंटेनरच्या कॅबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघात झाला यादरम्यान काही वेळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती, परंतु पोलिसांनी महामार्गाच्या चौपदरीकरण निर्माणाधीन मार्गावर वाहतूक वळवून सुरळीत केली.