शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळ; चौकशी समिती गठित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:35 IST

अकोला : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेतील घोळाची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ)आदेशानुसार, शुक्रवारी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआॅनलाइन बदली प्रक्रियेत अनियमितता झाली असून, अनेक शिक्षकांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. क्रारींची पडताळणी करून तथ्य जाणून घेण्यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्याचा प्रस्ताव २१ जून रोजी सादर करण्यात आला होता. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अन्यायासंदर्भात तक्रारींची पडताळणी या समितीकडून करण्यात येणार आहे.

अकोला : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेतील घोळाची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ)आदेशानुसार, शुक्रवारी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अन्यायासंदर्भात तक्रारींची पडताळणी या समितीकडून करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत अनियमितता झाली असून, अनेक शिक्षकांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत, तसेच यासंदर्भात शिक्षक संघटनांच्यावतीने शासनाकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्यांमधील घोळासंदर्भात, बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांवर अन्याय झाला, असे निदर्शनास आलेल्या शिक्षकांच्या तक्रारींची पडताळणी करून तथ्य जाणून घेण्यासाठी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गुरुवार, २१ जून रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांमधील घोळाच्या मुद्दयावर पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ ) कैलास पगारे यांनी शुक्रवार, २२ जून रोजी दिला. त्यानुसार चौकशी समितीमार्फत शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांमध्ये शिक्षकांवर झालेल्या अन्यायासंदर्भात पडताळणी करण्यात येणार आहे. चौकशी तातडीने पूर्ण करून अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेशही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी समितीला दिला आहे.चौकशी समितीत ‘यांचा’ आहे समावेश!जिल्हा परिषदेचे प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली असून, समितीचे सदस्य म्हणून उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष सोनी, निरंतर शिक्षणाधिकारी वैशाली ठग, प्राथमिक शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार आणि दोन संगणक परिचालकांचा चौकशी समितीमध्ये समावेश आहे.चौकशी समिती ‘या’ मुद्द्यांवर करणार तक्रारींची पडताळणी!जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांनी संवर्गनिहाय शासनाच्या पोर्टलवर आॅनलाइन सादर केलेली माहिती, प्रत्यक्षात करण्यात आलेल्या बदल्या आणि बदल्यांमध्ये अन्यायासंदर्भात शिक्षकांच्या प्राप्त तक्रारी इत्यादी मुद्द्यांवर पाच सदस्यीय चौकशी समिती पडताळणी करणार आहे. या पडताळणीत आढळून येणाºया तथ्याच्या आधारे चौकशी समितीकडून ‘सीईओं’कडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद