शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्रायकोकार्ड’ जैविक घटक तंत्रज्ञानावर भर : रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:39 IST

​​​​​​​अकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी रासायनिक कीटकनाशक ांचा अतिरेकी व अशास्त्रीय वापर टाळण्यासाठी जैविक घटक उत्पादन तंत्रज्ञानावर भर दिला जात असून, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व किडा या जैविक घटकांची माहिती शेतकर्‍यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत दिली जात आहे. विदर्भातील सहा तालुक्यांतील शेतकर्‍यांना यासंदर्भात प्रशिक्षित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनिंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व किडा या जैविक घटकांची माहिती शेतकर्‍यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत दिली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेकी व अशास्त्रीय वापर टाळण्यासाठी जैविक घटक उत्पादन तंत्रज्ञानावर भर दिला जात असून, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व किडा या जैविक घटकांची माहिती शेतकर्‍यांना प्रत्यक्ष प्रयोगशाळेत दिली जात आहे. विदर्भातील सहा तालुक्यांतील शेतकर्‍यांना यासंदर्भात प्रशिक्षित करण्यात आले आहे.वैदर्भीय शेती, शेतकरी हे किडी व रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त होत असल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात कापूस व सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांकडून अपेक्षित उत्पादन तर मिळालेच नाही, किंबहुना रासायनिक कीटकनाशक ांच्या अतिरेकी किंवा अशास्त्रीय वापराने जीवित हानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तंत्रज्ञानासह अल्प खर्चाच्या शाश्‍वत उपाययोजनासुद्धा विविध माध्यमांतून शेतकर्‍यांपर्यंत पोहोविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाच्यावतीने विदर्भातील सहा तालुक्यांतील ५१ शेतकर्‍यांना जैविक घटकांचे शुक्रवारी प्रशिक्षण देण्यात आले. शेतकर्‍यांना घाटेअळी विषाणू, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्ड, क्रायसोपा व ढाल किडा या सर्व जैविक घटकांचे उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष प्रयोगशाळेमध्ये प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आली.  रविवारी संपलेल्या तीन दिवसीय प्रशिक्षणात जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेचे प्रभारी डॉ. नीरज सातपुते, तसेच डॉ. अनिल कोल्हे, डॉ. गजानन लांडे व डॉ. सुनील भलकारे यांनी यासंबंधी प्रात्यक्षिकासह विस्तृत माहिती शेतकर्‍यांना दिली. कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी रासायनिक कीटकनाशक ांचे गुणधर्म व वापराच्या पद्धती समजावून सांगत सेंद्रिय शेतीचा वाढता प्रसार लक्षात घेता शाश्‍वत व अल्प खर्चाच्या जैविक कीटकनाशक ांचे व मित्र कीटकांचे महत्त्व अतिशय साध्या-सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच शेतकर्‍यांनी जैविक घटकाचे उत्पादन करण्याचे तंत्र आत्मसात करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कृषिभूषण शेतकरी हनवंतराव देशमुख यांनी विद्यापीठाचे आभार व्यक्त करीत पर्यावरणपूरक सेंद्रिय शेती करताना जैविक घटकांचा प्रभावी वापर शेतकर्‍यांना लाभदायक ठरणार असून, जीवित हानी टळेल व विषमुक्त अन्न उपलब्ध करण्याचे आपले कर्तव्य पार पडण्याचा आनंदसुद्धा मिळेल, असा आशावाद व्यक्त केला. 

टॅग्स :agricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ