शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांनी सुरू केले बेमुदत उपोषण

By admin | Updated: September 27, 2016 02:56 IST

शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशाची आदिवासी विद्यार्थ्यांनी केली मागणी.

अकोला, दि. २६- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला अंतर्गत येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील वसतिगृहांमध्ये सर्व नवीन अप्रवेशित विद्यार्थी विद्यार्थिनींना तत्काळ प्रवेश, वसतिगृहांची क्षमता वाढविणे तसेच प्रकल्प अधिकार्‍याची बदली या तीन मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवार, २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास प्रारंभ केला. यावेळी ३४ विद्यार्थी उपोषणास बसले असून, त्यांच्या सर्मथनार्थ जवळपास दोन हजार विद्यार्थी उपोषण मंडपात उपस्थित होते. अकोला, बुलडाणा व वाशिम या तीनही जिल्हय़ांतील बहुसंख्य आदिवासी विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे. वसतिगृहात प्रवेश मिळविण्यापूर्वींं आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रथम महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, ही अट तिन्ही जिल्हय़ातील विद्यार्थ्यांंनी पूर्ण करून मोठय़ा संख्येने वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज सादर केले आहेत. नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन तीन महिने झाले असून, प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांंची एकही यादी अद्याप लावण्यात आलेली नाही. परिणामी, शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर राहणार्‍या आदिवासी विद्यार्थ्यांंवर वणवण भटकण्याची पाळी आली आहे. गत शैक्षणिक वर्षात अशीच परिस्थिती निर्माण झालेली असताना, केवळ विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून माजी प्रकल्प अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांंची वसतिगृह प्रवेश क्षमता १२५ वरून २९४ वाढविली होती. आदिवासी विद्यार्थ्यांंचा ओढा शिक्षणाकडे वाढत आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांंसमोर वसतिगृह निर्माण होणारा हा प्रश्न दूर करण्यासाठी अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हय़ांतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांच्या वसतिगृहांचा विस्तार करून विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्याची मागणी आदिवासी विद्यार्थ्यांंनी केली आहे. अकोला जिल्हय़ातील वसतिगृहांची विद्यार्थी प्रवेश क्षमता एक हजाराने, तर बुलडाणा व वाशिम जिल्हय़ातील वसतिगृहांची क्षमता प्रत्येकी ५00 विद्यार्थी अशी वाढविण्याची मागणीसुद्धा या निवेदनात विद्यार्थ्यांंनी केली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आले. या आंदोलनात तीन जिल्हय़ातील ११ शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.