शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

माना वीज वितरण विभागाकडून झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:18 IST

संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यातील माना वीज वितरण उपविभागाकडून मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे; परंतु माना ...

संजय उमक

मूर्तिजापूर : तालुक्यातील माना वीज वितरण उपविभागाकडून मान्सूनपूर्व झाडांच्या फांद्या तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे; परंतु माना सबस्टेशन अंतर्गत येत असलेल्या माना गावात दि. १८ मे रोजी चार निंबाच्या झाडांची बुडापासून कत्तल केल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. या संदर्भात उपसरपंच मंगेश वानखडे यांनी तहसीलदारांकडे तक्रार दिली आहे.

माना सबस्टेशन अंतर्गत मान्सूनपूर्व काम सुरू आहे. याअंतर्गत झाडांच्या फांद्या न तोडता माना येथे चार कडुनिंबाचे झाड जमीनदोस्त केले. शासन एकीकडे वृक्ष लागवडीची मोहीम युद्धस्तरावर राबवित असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून विनापरवाना वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात माना वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता कमलेश मस्के यांना व मूर्तिजापूर येथील उपकार्यकारी अभियंता मनोज खांडरे यांना यासंदर्भात अवगत केले असता आम्ही घटनास्थळावर जाऊन पाहिले नाही व याबाबत कल्पना नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यासंदर्भात माना येथील उपसरपंच मंगेश वानखडे यांनी तहसीलदार व पोलीस स्टेशनला वीज वितरण कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे. (फोटो)

---------------

मान्सूनपूर्व तयारी करताना आम्ही झाडे बुडापासून कधीच तोडत नाही. केवळ झाडाच्या फांद्या छाटल्या जातात. असे झाले असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल.

- मनोज खांडरे, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, मूर्तिजापूर

--------------------

वृक्ष तोडण्यासाठी ग्रामपंचायतची आणि वनविभागाची परवानगी घेणे अपेक्षित होती. तलाठी, मंडळ अधिकारी यांचा पंचनाम्यासह अहवाल मागवून वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल.

- प्रदीप पवार

तहसीलदार, मूर्तिजापूर