अकोला : जठारपेठ परिसरात भर रस्त्यावर झाड कोसळ्याची घटना शनिवारी दुपारी घडली. हे झाड अचानकच कोसळले तरी त्यामुळे कुठलिही हाणी झाली नाही. शनिवारी सुसाट्याचा वारा नव्हता. किंवा पाऊसही नव्हता. आकाश निरभ्र होते. परंतु दुपारी अचानक जठारपेठ चौकातुन रतनलाल प्लॉट चौकाकडे जाणार्या रस्त्यावर होलीक्रॉस कॉन्व्हेंट शाळेच्या समोर एक झाड कोसळले. भर दुपारी रहदारीच्या रस्त्यावर झाड कोसळ्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. काही नागरिकांनी याची सुचना तात्काळ महापालिका प्रशासनाला दिली. त्यानंतर महापालिका कर्मचार्यांनी पडलेले झाड उचलले आणि रस्ता मोकळा केला. झाड रस्त्यात आडवे पडल्याने काही काळ या मार्गावरील वाहतुक विस्किळीत झाली होती.
जठारपेठेत झाड कोसळले
By admin | Updated: September 21, 2014 01:42 IST