शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

उपचार स्वस्त; पण औषधांसाठी रुग्ण मोजताहेत पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 13:44 IST

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब रुग्णांवर स्वस्तात उपचार होतो; पण औषधच उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना खासगी औषध केंद्रातून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहे.

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गरीब रुग्णांवर स्वस्तात उपचार होतो; पण औषधच उपलब्ध नसल्याने येथील रुग्णांना खासगी औषध केंद्रातून महागडी औषधे खरेदी करावी लागत आहे. सर्वोपचार रुग्णालयात नियमित लागणाऱ्या औषधांचा पुन्हा तुटवडा भासत असल्याने गरिबांसाठी हा उपचार महागडा ठरत आहे.खासगी दवाखाना किंवा रुग्णालयातील महागडा उपचार परवडत नाही, म्हणून हजारो रुग्ण दररोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात येतात. येथे अत्यल्प खर्चात त्यांच्यावर उपचार होत असून, नियमानुसार नि:शुल्क औषधही दिले जाते; मात्र गत काही दिवसांपासून येथे येणारा रुग्ण उपचारानंतर थेट खासगी औषध केंद्रावर औषध खरेदी करताना दिसून येतो. या रुग्णांशी संवाद साधला असता, उपचार स्वस्तात मिळाला, तरी सर्वोपचार रुग्णालयात औषधेच उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. शिवाय, उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनदेखील डॉक्टर बाहेरूनच आणायला सांगतात. खासगीत उपचार परवडत नाही, म्हणून सर्वोपचार रुग्णालयात आलेल्या रुग्णांना येथेही आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यंदा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संस्थेतर्फे सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकासाठी ही घोषणा दिली आहे; परंतु वास्तविकता यापेक्षा उलट असल्याचे निदर्शनास येत आहे.औषधांबाबतीत डॉक्टरही संभ्रमातगत वर्षभरापासून सर्वोपचार रुग्णालयात हाफकीनकडून औषध पुरवठ्याची समस्या सुरू आहे. त्यामुळे औषधेच उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून औषध आणायला सांगितल्या जायचे; परंतु यातील ५० टक्के औषधांचा पुरवठा झाल्याची माहिती आहे; परंतु संबंधित औषध उपलब्ध आहे की नाही, याबाबत डॉक्टरांमध्येच संभ्रम असल्याची माहिती सूत्रांनी दिली.तीन महिने पुरणार येवढाच औषध पुरवठा हाफकीनकडून पुरविण्यात आला होता. त्यातला बहुतांश औषध साठा संपण्याच्या मार्गावर आहे. या संदर्भात पत्रव्यवहार करणे सुरू आहे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय