शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात वाहतूक व्यवस्थेचा बट्टय़ाबोळ

By admin | Updated: September 16, 2014 18:22 IST

दुचाकी व तीनचाकी वाहने वाट्टेल तिथे लावण्यात येत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते.

अकोला - शहरातील बेताल वाहतुकीने कळस गाठला असून, दुचाकी व तीनचाकी वाहने वाट्टेल तिथे लावण्यात येत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळते. रस्त्याच्या मधोमध वाहने लावण्यात येत असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेऊन वाहतूक शाखेच्या माध्यमातून टोईंग पथक सुरू केले आहे. टोईंग पथक सुरू होऊन पाच ते सहा दिवसांचा कालावधी उलटला असला तरी बहुतांश मार्गावरील वाहतूक व्यवस्था अद्यापही आहे त्याच स्थितीत आहे. वाहन चालक कुठलेही नियम पाळत नसून आपली दुचाकी रस्त्यावर तसेच रस्त्याच्या मधोमध लावत असल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. शहरातील अत्यंत रहदारीचे असलेल्या मार्गावर वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, याला ही वाहने जबाबदार असल्याचे दिसून आले. दुकान व कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावर वाहने लावण्यात येत असून, त्यामुळे रस्त्यावरील वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. टोईंग पथक कार्यान्वित केल्यानंतर रस्त्यावरील अस्ताव्यस्त वाहनांवर कारवाई होणार, अशी अपेक्षा होती. मात्र, या टोईंग पथकातील कर्मचार्‍यांकडून दुजाभाव करण्यात येत असल्याने शहरातील बेताल वाहतूक आहे त्याच स्थितीत आहे. या टोईंग पथकाची कारवाई शहराच्या मध्यभाग व रहदारीचा मार्ग सोडून शहराबाहेर असलेल्या परिसरात सुरू असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गांधी रोड, टिळक रोड, स्टेशन ते कौलखेड रोड, सिव्हिल लाईन्स रोड, रतनलाल प्लॉट, जठारपेठ, दुर्गा चौक, जय हिंद चौक, जिल्हाधिकारी कार्यालय रोडसह शहराच्या महत्त्वाच्या मार्गावर वाहने लावण्यात येत असून, यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावरील अस्ताव्यस्त वाहनांवर कारवाई केल्यास वाहतुकीची समस्या बहुतांश प्रमाणात मार्गी लागण्याची शक्यता आहे.