शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आज मध्यरात्रीपासून संपावर

By admin | Updated: July 31, 2015 01:48 IST

ट्रान्सपोर्टनगरचेही भिजत घोंगडे.

अकोला : जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना महानगरपालिका हद्दीत प्रवेश बंदी केली असून, ट्रान्सपोर्टनगरची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांनी दररोज लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. या बाबत जिल्हा प्रशासनाला वारंवार दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक विचार करण्यात आला नसल्याने शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शुक्रवार ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने ६ जुलैपासून सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंंत ट्रान्सपोर्टधारकांच्या मालवाहू जड वाहनांना शहराच्या हद्दीत बंदी घालण्यात आली आहे. ट्रान्सपोर्टनगरअभावी शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच हा निर्णय घेण्यात आल्याने ट्रान्सपोर्टच्या मालवाहू जड वाहनांना बंदी घातल्याने ट्रान्सपोर्ट व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. या निर्णयामुळे दररोज लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने व्यावसायिक संकटात सापडले आहेत. शहरात घातलेली प्रवेश बंदी शिथील करण्यात यावी, अशी मागणी ट्रान्सपोर्ट संघटनेच्यावतीने ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री, पालकमंत्री, पोलीस अधीक्षक, वाहतूक निरीक्षक आदींना देण्यात आली होती. परंतु, प्रशासनाच्या वतीने या निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याने संघटनेच्यावतीने २0 जुलै रोजी पुन्हा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दुसर्‍यांदाही प्रशासनाने याबाबत गांभीर्य दाखवले नसल्याने ट्रन्सपोर्ट आणि संबंधित व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने घेण्यात आला. त्या अनुषंगाने शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक शुक्रवार, ३१ जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.