शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

१८ वाहनांमधून तब्बल १०७ गुरांची कत्तलीसाठी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 13:55 IST

अकोला: मध्यप्रदेशातून सातपुडा मार्गे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १८ वाहनांमध्ये १०७ जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून या गुरांना सोमवारी पहाटे जीवनदान दिले.

अकोला: मध्यप्रदेशातून सातपुडा मार्गे तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल १८ वाहनांमध्ये १०७ जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असताना स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून या गुरांना सोमवारी पहाटे जीवनदान दिले. सदर १८ वाहने ताब्यात घेण्यात आले असून, तब्बल १०७ गुरांना गोरक्षण संस्थेमध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती आहे.पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख व स्थाानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून १८ वाहनांमध्ये तब्बल १०७ विविध जातीच्या जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात हिवरखेड मार्गावर झरी गेट येथील जंगलामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून सदर वाहने जप्त केली तर त्यामधील १०७ गुरांना जीवनदान देण्यात आले आहे. ही वाहने हिवरखेड पोलीस ठाण्यामध्ये जमा करून कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारी हिवरखेड येथे आठवडी बाजार असल्यामुळे बनावट पावतीच्या आधारे जनावरांची खरेदी-विक्री होत असल्याची माहिती पुढे आली आहे. अठरा वाहनांमध्ये अतिशय निर्दयपणे कोंबून या जनावरांना कत्तलीसाठी नेण्यात येत होते; मात्र पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संबंधित जनावरांना जीवदान देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. सदर ठिकाणावरून काही आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. लाखोंचा मुद्देमाल हस्तगतपोलिसांनी गोवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून, एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईतील १८ वाहने व जनावरांची किंमत लाखोंच्या घरात असून, हा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी या टोळीला चांगलाच दणका दिला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला