शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ११ महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:48 IST

अकोला: महसूल विभागाच्या आदेशानुसार २० फेबु्रवारी महसूल विभागातील अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

अकोला: महसूल विभागाच्या आदेशानुसार २० फेबु्रवारी महसूल विभागातील अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील ११ महसूल अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या असून, अकोल्याचे नवे निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) म्हणून अमरावतीचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) राम लठाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील ११ महसूल अधिकाºयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बाळापूरचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांची बदली करण्यात आली; मात्र त्यांच्या पदस्थापनेचे ठिकाण अद्याप निश्चित नाही. त्यांच्या जागी बाळापूरचे नवे उपविभागीय अधिकारी म्हणून यवतमाळचे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अकोटचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांची अमरावती येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अकोटचे उपविभागीय अधिकारी म्हणून अमरावती येथील उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांची नियुक्ती करण्यात आली. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अनिल खंडागळे यांची वाशिम येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अमरावतीचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) संदीप महाजन येत आहेत. रोहयो उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांची यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) म्हणून बदली करण्यात आली आहे. बाळापूरचे तहसीलदार डी. पी. पुंडे यांची यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी अंजनगावचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी येत आहेत. पातूरचे तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी यांची पुसद येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी देऊळगाव राजाचे तहसीलदार डी.आर. बाजड यांची नियुक्ती करण्यात आली. मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे यांची नांदुरा येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी चिखलदराचे तहसीलदार प्रदीप पवार येत आहेत. नझूल अधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार (महसूल) म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार मनोज लोणारकर नझूल तहसीलदार म्हणून येत आहेत. अकोटचे तहसीलदार व्ही.व्ही. घुगे यांची अंजनगाव येथे तहसीलदारपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी दिग्रसचे तहसीलदार किशोर बागडे येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील खरेदी अधिकारी पूजा माटोडे यांची घाटंजी येथे तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली. बार्शीटाकळीचे तहसीलदार आर.ए. काळे यांची यवतमाळ येथे सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली करण्यात आली.

 

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग