शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

२६00 अधिका-यांना प्रशिक्षण

By admin | Updated: February 16, 2017 22:17 IST

अकोला कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मनपाची कार्यशाळा.

अकोला, दि. १६- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सहायक अधिकारी अशा एकूण २ हजार ६00 अधिकारी-कर्मचार्‍यांना निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्यावतीने बुधवारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दुसरी कार्यशाळा पार पडली. मनपा क्षेत्रातील २0 प्रभागांमधून ८0 सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी मतदान तसेच २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल. यासाठी ५८७ मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांची संख्या पाहता प्रशासनाने केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सहायक अधिकारी यांचा समावेश असलेल्या ६५0 पथक ांचे गठन करण्यात आले. यामध्ये एकूण २ हजार ६00 अधिकारी-कर्मचार्‍यांचा समावेश असून, कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना निवडणुकीच्या कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर निवडणूक निर्णय अधिकारी पी.ए. तट्टे, श्रीकांत देशपांडे, ए.पी. मोहोड, डी.एम. पालोदकर, मनपा उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, प्रज्ञा खंडारे, निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे तसेच क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यशाळेचे संचालन अनिल बिडवे यांनी केले. कार्यशाळा कामकाजाची जबाबदारी निवडणूक विभागाचे गणेश टाले, अरुण पाचपोर, गजानन मुर्तळकर, सुधीर मालटे, संजय चव्हाण, भरत शर्मा, कैलास ठाकूर, सतीश वखारिया, राजेश कोंडाणे, राजेश जाधव, दिनेश मेहरे, पूर्णाजी पाटील, पुरुषोत्तम इंगळे, रवींद्र शिंदे व सुहास लडिकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती.१0७ अधिकारी-कर्मचार्‍यांची अनुपस्थितीदोन सत्रात कार्यशाळा घेण्यात आली. सकाळी १0 ते दुपारी १ पर्यंतच्या पहिल्या सत्रात ३९0 पथकांतील १ हजार ५६0 मतदान अधिकारी-कर्मचार्‍यांपैकी १ हजार ४८६ जणांनी उपस्थिती लावली, तर दुपारी २ ते ५ पर्यंतच्या कालावधीत आयोजित केलेल्या दुसर्‍या सत्रात २६0 पथकांतील अधिकारी-कर्मचार्‍यांपैकी १ हजार नऊ अधिकारी-कर्मचार्‍यांनी हजेरी लावली. मनपाच्या दुसर्‍या कार्यशाळेला १0७ अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित होते. इव्हीएमबद्दल दिली माहितीकार्यशाळेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सहायक अधिकारी यांना महापालिका आयुक्त अजय लहाने, निवडणूक निर्णय अधिकारी संजय खडसे, मनपा उपायुक्त तथा नोडल अधिकारी समाधान सोळंके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मतदान यंत्राचा वापर क सा करायचा, यासह मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली. ही माहिती चलचित्रपटाद्वारे देण्यात आली. मतदान यंत्राबाबत प्रशांत बुले यांनी सविस्तर माहिती विशद केली.