शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्राफिक पॉईंट झाले वसुलीचे अड्डे!

By admin | Updated: July 6, 2014 19:42 IST

महामार्ग वाहतूक नियंत्रण शाखेच्या विभागाकडून आर्थिक लुबाडणूक होत असल्याने महामार्गावरील ट्रॅफिक पॉईंट पोलिसांसाठी वसुलीचे अड्डे बनले आहेत.

अकोला: पावसाला अमरावती विभागातील राष्ट्रीय महामार्गावर डझनावर ट्राफिक पॉईंट आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून दररोज हजारो वाहने धावतात. यामध्ये जड, अतिजड वाहनेसुद्धा असतात. पासिंग शुल्काच्या नावाखाली महामार्गावरील वाहनचालकांकडून दररोज महामार्ग वाहतूक नियंत्रण शाखेच्या विभागाकडून आर्थिक लुबाडणूक होत असल्याने महामार्गावरील ट्रॅफिक पॉईंट पोलिसांसाठी वसुलीचे अड्डे बनले आहेत. गुरुवारी एसीबीने केलेल्या कारवाईनंतर तर यावर शिक्कामोर्तबच झाले आहे. महामार्गावरील ट्रॅफिक पॉईंटवर रुजू होण्यासाठी लाखो रुपये मोजले जातात. त्यामागे कारणही तसेच आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅफिक पॉईंट हे कमाईचे मोठे साधन आहे. वाहने अडवून त्यांच्याकडून पासिंग शुल्काच्या नावाखाली हजारो रुपयांची चिरीमिरी घेतल्या जाते. राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या वाहनचालकांना पोलिस ठाणे आणि ट्रॅफिक पॉईंटवरील अधिकारी, कर्मचार्‍यांचे खिसे गरम केल्याशिवाय पुढेच जाऊ देत नसल्याचे चित्र दररोजचेच आहे. या सर्व प्रकारामध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांपासून ते कर्मचार्‍यांपर्यंत सगळेच गुंतलेले असतात. वाहनचालकांकडून वसूल केलेली चिरीमिरीनंतर हे लोक आपसात वाटून घेतात. वाहनचालकही उगाच वाद नको म्हणून रक्कम देऊन पुढचा मार्ग धरतात.