शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक निरीक्षकाची अधीक्षकास मारहाण

By admin | Updated: April 3, 2017 02:50 IST

मध्यवर्ती बसस्थानकामधील प्रकार, वाहतूक निरीक्षकाविरु द्ध गुन्हा दाखल.

अकोला, दि. २- मध्यवर्ती बसस्थानकावरील वाहतूक निरीक्षकाने सहायक कार्यशाळा अधीक्षकास मनपा निवडणुकीतील एका विजयी उमेदवाराच्या हजेरीवरून बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बसस्थानक येथे कार्यरत असलेले वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे यांनी सहायक कार्यशाळा अधीक्षक नीलेश बोदडे यांना मनपामध्ये विजयी झालेल्या एका उमेदवाराची हजेरी लावण्याचे सांगितले, मात्र जो व्यक्ती कार्यालयात हजर नाही, त्याची हजेरी लावण्यास नीलेश बोदडे यांनी नकार दिल्याने, वाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे यांनी बोदडे यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या नीलेश बोदडे यांना सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रशांत इंगळे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२३, २९४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी मात्र अद्यापही प्रशांत इंगळे याच्यावर कारवाई करण्यास धजावत नसल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत असून, कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍या वाहतूक निरीक्षकावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.१५0 चालक-वाहकांची तक्रारवाहतूक निरीक्षक प्रशांत इंगळे हे चालक-वाहकांशी असभ्य भाषेत बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे १५0 चालक-वाहकांनी प्रशांत इंगळे यांची तक्रार राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप कारवाई केली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इंगळे यांनी नीलेश पिंजरकर नामक कर्मचार्‍यालाही मारहाण केल्याची माहिती आहे.