शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रणपिसे नगर रोडवर वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:18 IST

अकोला : सिव्हिल लाइन्स चौकातून रणपिसे नगरकडे जाताना तीन ते चार हॉस्पिटल एकाच ठिकाणी असल्याने या चौकात वाहतूक मोठ्या ...

अकोला : सिव्हिल लाइन्स चौकातून रणपिसे नगरकडे जाताना तीन ते चार हॉस्पिटल एकाच ठिकाणी असल्याने या चौकात वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन येथील रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कौलखेड चौकात अतिक्रमण वाढले

अकोला : कौलखेड चौकात भाजीपाला विक्रेते तसेच फळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या ठिकाणी अपघातात वाढ होत आहे. रस्ता नव्याने निर्माण करण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या कडेला विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने वाहनांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या रोडवर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

खासगी कोविड सेंटरमध्ये लूट

अकोला : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची खासगी कोविड सेंटरमध्ये आर्थिक लूट करण्यात येत असल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तेलगोटे नामक व्यक्ती खासगी कोविड सेंटरमध्ये दाखल होते. त्यांना एकच देयक दोन वेळा लावल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उखडले

अकोला : कोट्यवधी रुपये खर्चून शहरात नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उखडल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय समोरील रस्ता तसेच सिव्हिल लाइन्स समोरील रस्त्यावर खड्डे पडले असून सिमेंट रस्त्यातील लोहा बाहेर निघाल्याचे दिसून येत आहे.

रेल्वेखाली आल्याने इसमाचा मृत्यू

अकोला : अकोला-गायगाव रेल्वे रुळावर जुने शहरातील एका इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

रेल्वे स्टेशन चौकातील बस थांबा रद्द करावा

अकोला : शहरातून अकोटकडे जाणाऱ्या एसटी बसेस रेल्वे स्टेशन चौकात थांबत असल्याने या ठिकाणी अपघात होत आहेत. तसेच वाहतूक विस्कळीत होत असल्याने या ठिकाणच्या बस थांबा रद्द करावा, अशी मागणी काही वकिलांनी केली आहे.

रतनलाल प्लॉट चौकात अपघात

अकोला : रतनलाल प्लॉट चौकात अमोरासमोर आलेल्या दोन दुचाकीमध्ये अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात एकास किरकोळ मार लागला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोघांनीही सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठले; मात्र आपसात प्रकरण मिटविण्यात आले.