शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रणपिसे नगर रोडवर वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:16 IST

अकोला : सिव्हिल लाइन्स चौकातून रणपिसे नगरकडे जाताना तीन ते चार हॉस्पिटल एकाच ठिकाणी असल्याने या चौकात वाहतूक मोठ्या ...

अकोला : सिव्हिल लाइन्स चौकातून रणपिसे नगरकडे जाताना तीन ते चार हॉस्पिटल एकाच ठिकाणी असल्याने या चौकात वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन येथील रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कौलखेड चौकात अतिक्रमण वाढले

अकोला : कौलखेड चौकात भाजीपाला विक्रेते तसेच फळ विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने याठिकाणी अपघातात वाढ होत आहे. रस्ता नव्याने निर्माण करण्यात आला आहे. मात्र रस्त्याच्या कडेला विक्रेते ठाण मांडून बसत असल्याने वाहनांना अडचणी येत आहेत. त्यामुळे या रोडवर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

खासगी कोविड सेंटरमध्ये लूट

अकोला : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची खासगी कोविड सेंटरमध्ये आर्थिक लूट करण्यात येत असल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तेलगोटे नामक व्यक्ती खासगी कोविड सेंटरमध्ये दाखल होते. त्यांना एकच देयक दोन-दोन वेळा लावल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उखडले

अकोला : कोट्यवधी रुपये खर्चून शहरात नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उखडल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय समोरील रस्ता तसेच सिव्हिल लाईन्स समोरील रस्त्यावर खड्डे पडले असून सिमेंट रस्त्यातील लोहा बाहेर निघाल्याचे दिसून येत आहे.

रेल्वेखाली आल्याने इसमाचा मृत्यू

अकोला : अकोला गायगाव रेल्वे रुळावर जुने शहरातील एका इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

रेल्वे स्टेशन चौकातील बस थांबा रद्द करावा

अकोला : शहरातून अकोटकडे जाणाऱ्या एसटी बसेस रेल्वे स्टेशन चौकात थांबत असल्याने या ठिकाणी अपघात होत आहेत. तसेच वाहतूक विस्कळीत होत असल्याने या ठिकाणच्या बस थांबा रद्द करावा, अशी मागणी काही वकिलांनी केली आहे.

रतनलाल प्लॉट चौकात अपघात अकोला : रतनलाल प्लॉट चौकात समोरासमोर आलेल्या दोन दुचाकीमध्ये अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात एकास किरकोळ मार लागला असून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोघांनीही सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले, मात्र आपसात प्रकरण मिटविण्यात आले.