शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कौलखेड मार्गावर वाहतूक कोंडी; रस्ता रुंदीकरणावर शिक्कामोर्तब, रस्त्याचे ३० फुट होणार रुंदीकरण 

By आशीष गावंडे | Updated: August 9, 2023 18:02 IST

शहरातील खदान ते कौलखेड ते आरटीओ कार्यालयापर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्यासोबतच अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

अकोला : शहरातील खदान ते कौलखेड ते आरटीओ कार्यालयापर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्यासोबतच अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. वाहनचालकांची होणारी गैरसोय पाहता या रस्त्याचे महानपर्यंत रुंदीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घेतल्याची माहिती आहे. हा रस्ता सुमारे ३० फुट रुंद केला जाणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्याची शक्यता आहे. 

शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने १४ कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी प्रमुख सहा रस्त्यांचे रुंदीकरण व कॉक्रिटीकरणाचा निर्णय घेतला होता. यामध्ये खदान ते कौलखेड ते खडकी या रस्त्याचा समावेश नव्हता. वर्तमानस्थितीत या मार्गावरुन बार्शीटाकळी तालुका तसेच वाशिम ते यवतमाळ जिल्ह्यासाठी प्रवासी व जडवाहतूक सुरु आहे. परंतु हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. यामुळे मनपा क्षेत्रातील खदान ते शिवापूर भागातील नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. उशिरा का होईना, या समस्येवर रस्ता रुंदीकरणाचा तोडगा काढण्यात आला आहे. 

दोन्हीकडेला प्रत्येकी १५ फुट रुंदीकरणखदान ते कौलखेड ते शिवापूर पर्यंत रस्त्याच्या दोन्हीकडेला प्रत्येकी १५ फुट रुंदीकरण केले जाणार आहे. यामुळे दैनंदिन वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविल्यास या भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महान पर्यंत रस्ता रुंदीकरणराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने शहराच्या चारही बाजूकडील रस्त्यांचे चाैपदरीकरण केल्यामुळे वाहतूक व्यवस्था गतीमान झाली आहे. दरम्यान, अकोला ते महान या मार्गावरील व्यस्त वाहतूक लक्षात घेता खदान ते महान पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा जिल्हावासियांसाठी मोठा दिलासा मानला जाइल.

टॅग्स :Akolaअकोला