शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाच्या विळख्याने वाहतुकीला खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 13:52 IST

अतिक्रमकांचा प्रचंड हैदोस असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे.

- सचिन राऊत 

अकोला: जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोड, टिळक रोडवर अतिक्रमकांचा प्रचंड हैदोस असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे महापालिक ा प्रशासनाची डोळेझाक असल्याने वाहतूक पोलिसांनाही अतिक्रमक जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.गांधी रोडवर मुख्य बाजारपेठ असल्याने वाहन चालकांची मोठी गर्दी असते. या रोडवर फेरीवाल्या अतिक्रमकांनी मोठा वेडाच घातल्याने वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. गांधी चौक ते सिटी कोतवाली हा रस्ता ‘वन वे’ करण्यात आला असला तरी मात्र योग्य नियोजन नसल्याने या रस्त्यावर नेहमीच जाम लागलेला असतो. याकडे वाहतूक पोलिसांसह सिटी कोतवाली पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. अशातच महापालिकेच्या आशीर्वादाने अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यावरून वाहने चालविण्यास जागाच बाकी नसल्याचे वास्तव आहे. गांधी चौकात चौपाटी तसेच हातगाड्यांचे मोठे अतिक्रमण असल्यानेही या परिसरात वाहतूक कोंडी होत असून, पोलीसही हैराण झाले आहेत. पेरण्यांची लगबग सुरू होणार असल्याने टिळक रोडवरील आता शेतकऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे. अशातच या रोडचे बांधकाम सुरू असल्याने बी-बियाणे, खते आणि कीटकनाशक ने-आण करण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार यात शंका नाही. वाहतूक पोलिसांचेही या रोडवरील बेताल वाहतुकीकडे दुर्लक्ष आहे. रस्त्याच्या बांधकामाने नागरिक बेहालटिळक रोडसह रेल्वे स्टेशन ते जेल चौक परिसरात उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या दोन्ही रोडच्या बाजूला प्रचंड मोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये पाणी टाकण्यात आले आहे. या रोडवर गत पावसाळ्यात प्रचंड चिखल झाल्याने यामध्ये बसून शिवसेनेचे सागर भारुका यांनी आंदोलन छेडले होते. या दोन्ही रोडवर रोजच अपघात होत असून, रविवारीही एक मुलगा खाली कोसळून गंभीर जखमी झाला. कंत्राटदाराची मनमानी; धुळीचे साम्राज्यसिटी कोतवाली ते शिवाजी महाविद्यालय तसेच मुख्य पोस्ट कार्यालयासमोरील उडाण पूल आणि रस्त्याचे बांधकाम करण्यात येत असून, या रस्त्याचे बांधकाम करणाºया कंत्राटदाराची प्रचंड मनमानी सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, प्रचंड धूळ होत असल्याने वाहनांमध्ये अपघात होत आहेत. दोन बाजंूनी करण्यात आलेल्या रस्त्याच्या मध्ये चर किंवा कपार असल्याने त्यावर वाहने स्लिप होत असून, रोजच अपघातात काही जण जखमी होत आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका