शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जनता बाजारातील व्यावसायिकांनी पुकारला बंद, बाजारात शुकशुकाट

By आशीष गावंडे | Updated: October 7, 2022 19:07 IST

अकोला येथे जनता बाजारातील व्यावसायिकांनी बंद पुकारला. 

अकोला: जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल उभारण्यासाठी नियमबाह्यरित्या जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली जात असल्याच्या निषेधार्थ बाजारातील व्यावसायिकांनी कडकडीत बंद पुकारत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात ठिय्या दिला. यासंदर्भात न्याय देण्याची मागणी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवदेनाद्वारे करण्यात आली. शहराच्या मध्यभागातील जनता भाजी बाजारच्या जागेवर वाणिज्य संकुल तसेच जुने बस स्थानकाच्या जागेवर वाणिज्य संकुल व सीटी बससाठी वाहनतळाचे आरक्षण आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जून २०१८ रोजी या दोन्ही जागेचा आगाऊ ताबा देण्याचा आदेश पारित केला होता. २०१८ मधील बाजार मुल्यानुसार या दोन्ही आरक्षित भूखंडांचे मुल्यांकन १३७ कोटी रुपयांपेक्षा अधिक होत असताना मनपा प्रशासनाने २६ कोटी रुपये जमा केले. यामुळे शासनाचे १११ कोटी रुपयांचे नुकसान करण्यात आले असून देशातील सर्वात मोठ्या एका कॉर्पोरेट कंपनीला ही जागा देण्यासाठी बाजारातील एक हजार कुटुंबियांची दुकाने उध्वस्त करण्याचे षडयंत्र आखण्यात आल्याचा आरोप करीत महात्मा फुले जनता बाजार संघर्ष समितीने गुरुवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले होते.

उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेटजिल्हा नियोजन समितीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी अकोल्यात दाखल झाले होते. यावेळी जनता बाजारातील व्यावसायिकांनी त्यांची भेट घेउन निवेदन दिले. सन १९७२ मध्ये तत्कालीन नगर परिषदेने व्यावसायिकांना आठवडी बाजारासाठी जनता भाजी बाजाराची जागा दिली होती. ही जागा कायमस्वरुपी भाडेपट्टयाने मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष सज्जाद हुसेन, उपाध्यक्ष पंकज मनियार, सल्लागार प्रदिप वखारिया, विजय तिवारी, निलेश चिराणीया, जितेंद्र अग्रवाल आदी उपस्थित होते.

बाजारात शुकशुकाटजनता बाजारातील व्यावसायिकांनी एकत्र येत गठीत केलेल्या संघर्ष समितीच्यावतीने शुक्रवारी बाजार बंदची हाक देण्यात आली होती. संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजी बाजार, होलसेल फ्रुट बाजार, फुले विक्रेता, किराणा,कापड व्यावसायिकांनी कडकडीत बंद पुकारल्याचे दिसून आले. 

टॅग्स :AkolaअकोलाStrikeसंप