शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांची शिवसेनेकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:21 IST

अकोला : जनता भाजी बाजारातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात बाजारातील भाजीपाला व फळे विक्री व्यावसायिकांनी सोमवारी ...

अकोला : जनता भाजी बाजारातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनपा प्रशासनाच्या विरोधात बाजारातील भाजीपाला व फळे विक्री व्यावसायिकांनी सोमवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्याकडे धाव घेतली. यावेळी व्यावसायिकांची बाजू ऐकून घेण्यासाठी सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आली आहे.

तत्कालीन नगरपरिषदेच्या कालावधीपासून भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी जनता भाजी बाजाराची जागा तत्कालीन जिल्हा प्रशासनाने लीज पट्ट्यावर दिली होती. दरम्यान, या जागेवरील आरक्षण लक्षात घेता, ही जागा विकसित करण्याच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे जागेचे शुल्क जमा केले आहे. परंतु या जागेमध्ये मागील अनेक वर्षांपासून पिढ्यान्‌ पिढ्या व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसाठी मनपा प्रशासनाकडे कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याचा आक्षेप व्यावसायिकांनी घेतला आहे. व्यावसायिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत प्रशासनाच्या स्तरावर दुकाने हटविण्यासाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी भाजीपाला व फळे विक्रेता व्यावसायिक संघटनांनी एकत्र येत सेनेचे जिल्हाप्रमुख तथा आ. नितीन देशमुख यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे बैठक आयोजित करून या बैठकीत व्यावसायिकांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती सेनेकडून पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांना करण्यात आली आहे.

संघर्ष कृती समितीचे होणार गठन

मनपा प्रशासनाच्या एकतर्फी कार्यवाहीला विरोध करण्यासाठी जनता भाजी बाजारातील भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या विविध संघटना एकत्र येणार आहेत. यावेळी संघर्ष कृती समितीचे गठन करून त्याद्वारे प्रशासनाच्या मनमानी निर्णयाला लढा दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.

सेना-काँग्रेसचा हातात हात

भाजी बाजारातील व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशातून शहरात शिवसेना व काँग्रेस एकत्र आले आहेत. काँग्रेसच्यावतीने विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण व सेनेचे शहरप्रमुख तथा गटनेता राजेश मिश्रा यांनी व्यावसायिकांसाठी हातात हात घेतल्याचे चित्र आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

जनता भाजी बाजारातील व्यावसायिकांची बाजू समजून घेण्यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. सेनेच्या पत्रावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.