शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोट बाजार समितीत व्यापार बंद

By admin | Updated: May 17, 2017 02:44 IST

शिवसेनेचे हल्लाबोल आंदोलन : हमीभावाने माल खरेदीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट: अकोट बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा उघड्यावर पडलेला शेतमाल शेडमध्ये ठेवण्यात यावा तसेच हमीदरापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करण्यात येऊ नये या मागणीकरिता शिवसेनेने बाजार समितीत १६ मे रोजी हल्लाबोल आंदोलन केले. यावेळी बाजार समितीच्या सचिवांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. दरम्यान, व्यापाऱ्यांनी हमी भावाने शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजार हा पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.अकोट बाजार समितीमध्ये शेतकरी पॅनल व शिवसेनेने माजी आमदार संजय गावंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बाजार समिती गाठली. यावेळी बाजार समितीची पाहणी केली असता शेतकऱ्यांचा माल उघड्यावर तर व्यापाऱ्यांचा माल टिनशेडमध्ये असल्याचे आढळून आले. दोन महिन्यांपेक्षा जास्त तूर खरेदीला वेळ लागत असल्याचे निदर्शनास आले. तसेच हमीदरापेक्षा कमी दराने तूर व इतर शेतमाल व्यापारी खरेदी करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सचिव राजकुमार माळवे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी सचिव माळवे यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाची व्यवस्था शेडमध्ये करण्यात येईल. व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला माल शेडमधून खाली करण्यात येईल. हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी केलेला तूर व इतर शेतमाल खरेदीदारांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन माजी आमदार गावंडे यांना दिले. त्यानंतर बाजार समिती सचिव व व्यापारी यांची बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी हमीभावाच्या दराने तूर, भूईमूग व इतर शेतमाल खरेदी करण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती पुढील सूचनेपर्यंत धान्य बाजार बंद ठेवला असून, शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीकरिता आणू नये, अशा सूचना केल्या आहेत. बाजार समितीमध्ये माजी आमदार संजय गावंडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, तालुका प्रमुख श्याम गावंडे, भाऊराव अंबळकार, काशिराम साबळे, डॉ. गजानन महल्ले, प्रदीप वानखडे, ज्ञानदेव परनाटे, वत्सला खंडारे, प्रमोद खंडारे, मोहन गावंडे, डॉ. प्रमोद चोरे, साहेबराव भगत, निवृत्ती मेतकर, शरद नहाटे, दत्ताभाऊ चौधरी, राजू भालतिलक, ज्ञानेश्वर बोरोकार आदींसह शिवसेना, शेतकरी पॅनलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.