लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : लग्नाचे आमिष दाखूवन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी वरुड बिहाडे येथील युवकाविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी २५ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे.वरुड बिहाडे येथील नितीन श्रीकृष्ण बिहाडे याने गावातील २३ वर्षीय विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे शारीरिक शोषण केले. युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून तेल्हारा पोलिसांनी युवकाविरुद्ध कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आतराम करीत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 02:59 IST